शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Kolhapur: वळणावर गिअर बदलताना एसटी बस मागे येवून दुचाकीस धडकली; विद्यार्थीनी ठार, वडील जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 14:10 IST

गडहिंग्लज: वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येवून दुचाकीस धडकली. या धडकेत दुचाकीस्वार संजना ...

गडहिंग्लज: वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येवून दुचाकीस धडकली. या धडकेत दुचाकीस्वार संजना आनंदा हुदली (वय १९) या महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीवरमागे बसलेले तिचे वडील आनंदा हुदली (४९, रा.भडगाव ता. गडहिंग्लज) हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, भडगाव येथील आनंदा हुदली हे चिंचेवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात लेखनीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची मुलगी संजना ही त्याच महाविद्यालयात फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास संजना व आनंदा हे दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघाले होते. दरम्यान, गडहिंग्लजहून हसूरवाडीकडे निघालेली बस त्यांच्या पुढे होती. बेरडवाडीनजीकच्या वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे आली. त्यावेळी एसटीच्या धडकेमुळे पाठीमागून येणारी त्यांची दुचाकी एस.टी.च्या पाठीमागील चाकात अडकली.अपघातात संजना व आनंदा दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.परंतु, उपचारापूर्वीच तिची मृत्यू झाला. आनंदा यांच्यावर उपचार सुरू आहेत. गडहिंग्लज पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू