शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचाऱ्यांची पी.एफ., ग्रॅज्युईटीची ८०० कोटी रुपयांची रक्कम थकली

By संदीप आडनाईक | Updated: April 21, 2023 18:09 IST

मदतीचा सरकारचा दावा खोटा असल्याचा श्रीरंग बरगे यांचा आरोप

कोल्हापूर : एसटी बँक, भविष्य निर्वाह निधी व उपदान अशी मिळून एसटी कर्मचाऱ्यांची ९६० कोटी रुपयांची देणी थकली आहेत, मदतीची परिपत्रके काढली जात असून प्रत्यक्षात मात्र निधी दिला जात नाही. त्यामुळे एसटीला मदत करीत असल्याचा सरकारचा दावा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता बरगे यांनी शुक्रवारी ही माहिती पत्रकारांना दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून चार वर्षे निधी देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने न्यायालयात मान्य केले होते. पण गेले अकरा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची ९६० कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. जमा खर्चाच्या मागवलेल्या तपशीलानुसार अकरा महिन्याच्या कालावधीत १६०० कोटी रुपयांची तूट असल्याचे एसटीने सरकारला कळविले होते, मात्र ही तफावत रक्कम अजूनही मिळालेली नाही, असाही आरोप त्यांनी केला.कोरोना आणि संपामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीची एसटी को-ऑफ बँकेची अंदाजे १६० कोटी रुपये इतकी रक्कम महामंडळाने बँकेकडे डिसेंबर २०२२ पासून भरणा केलेली नसून त्याचा फटका बँकेला बसत आहे. हीच रक्कम बँकेने गुंतवली असती तर त्यावर एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज बँकेला मिळाले असते. पण ते बुडाले असून त्याची झळ बँकेला सोसावी लागली आहे. भविष्य निर्वाह निधी आणि उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून वेतनातून कपात केलेल्या पी.एफ. आणि ग्रॅच्युईटीच्या रक्कमेचा हिस्सा एसटीने या ट्रस्टकडे भरणा केलेला नाही. सप्टेंबर २२ पासून अंदाजे ८०० कोटी रुपये इतकी रक्कम न भरल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे अंदाजे चाळीस कोटी रुपये व्याज बुडाले आहे. यामुळे ट्रस्टचे परिणामी कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला सरकार जबाबदार आहे, असा आरोप बरगे यांनी केला आहे. महिन्याला येणारी तूट भरून काढण्यासाठी तफावतीची रक्कम सरकारने तात्काळ दिली पाहिजे अशी मागणीही बरगे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरProvident Fundभविष्य निर्वाह निधी