शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2023: विषयच हार्ड! पास होणार नाहीस म्हणून चिडवणाऱ्या मित्रांनीच काढली उंटावरून मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 19:30 IST

मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कोल्हापूर : काहीतरी हटके करण्यात कोल्हापूरकर नेहमीच आघाडीवर असतात. असाच काहीशा प्रसंग आज पुन्हा अनुभवायला आला. हौसेला अन् जल्लोषामध्ये तर कोल्हापूरकरांचा नादच खुळा असतो. आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला अन् मित्र पास झाला म्हणून मित्रांनीच त्याची थेट उंटावरुनच मिरवणूक काढली. याच मित्रांनी त्याला पास होणार नाही म्हणून चिडवले होते. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.समर्थ सागर जाधव असे या उंटावरुनच मिरवणूक काढण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. समर्थने एस एम लोहिया हायस्कुलमधून दहावीची परीक्षा दिली होती. तो पासच होणार नाही म्हणून त्याला मित्र वर्षभर चिडवत होते. मात्र आज, दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला अन् समर्थ 51 टक्के गुण मिळवत पास झाला. यानंतर मात्र ''भावा, पास झालास!'' असे म्हणत मित्रांनी समर्थची थेट उंटावरूनच मिरवणूक काढत आपल्या मित्र प्रेमाचा दाखला दाखवून दिला. कोल्हापुरातील गंगावेश परिसरात तासभर ही मिरवणूक सुरु होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज, शुक्रवारी जाहीर झाला. निकालात यंदाही कोकण विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. तर, कोल्हापूरचा निकाल ९६.२२% लागला असून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीSSC Resultदहावीचा निकाल