शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

ssc exam: वेळ वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांतून समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 12:10 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे.

संतोष मिठारीकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षी दहावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येत आहे. पेपरसाठी मंडळाने १५ ते ३० मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे परीक्षेत डोक्याबरोबर हातही चालत आहेत. पेपर पूर्ण सोडविण्यावर आमचा भर असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षार्थींनी शुक्रवारी सांगितले.दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे. अंतिम लेखी परीक्षेत अभ्यास होऊनही पेपर लिहिता आला नाही, पूर्ण सोडविता आला नाही, तर अडचणीचे ठरणार असल्याचे पालक, विद्यार्थ्यांना वाटत होते. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने यावर्षी पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लिहिण्याची अडचण दूर 

दहावीचा अभ्यास पूर्ण झाला. पण, ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची थोडी अडचण वाटत होती. मात्र, वेळ वाढवून मिळाल्याने ती दूर झाली आहे. - शुभम डावरे

अर्धा तास जादा वेळ वाढवून मिळाल्याने पेपर सोडविणे अधिक सोयीस्कर झाले आहे. पहिला पेपर आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवला. - सृष्टी आणि साक्षी गुरव

बोर्डाने वेळ वाढवून दिल्याने आम्हा विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषयांच्या पेपरसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. - वेदिका पाटील

तज्ज्ञ शिक्षक म्हणतात

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी झाला होता. आता वेळ वाढवून मिळाल्याने परीक्षा देणाऱ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी पूर्णपणे पेपर सोडवत आहेत. - एच. आर. लोंढे

यावर्षी बोर्डाने विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी ३०, तर ४० गुणांच्या पेपरकरिता १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे.  - विशाल सासमिले

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थी