‘लोकमत’च्या रक्तदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By Admin | Updated: July 3, 2014 01:02 IST2014-07-03T01:00:21+5:302014-07-03T01:02:13+5:30
कोल्हापूर : रुग्णाला पुनर्जीवन मिळवून देतानाच विविध जाती-धर्माच्या लोकांना मानवतेच्या नात्यात बांधणाऱ्या रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘लोकमत’च्या रक्तदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : रुग्णाला पुनर्जीवन मिळवून देतानाच विविध जाती-धर्माच्या लोकांना मानवतेच्या नात्यात बांधणाऱ्या रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निमित्त होते ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे.
नागाळा पार्क येथील शाहू ब्लड बँक येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने व शाहू ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षता पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी रोटरी क्लब आॅफ कोल्हापूरचे चेअरमन सुभाष मालू, प्रशासन अधिकारी अमर पाटील, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष भोगशेट्टी, सहसरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील, उप वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील, वृत्तपत्र विक्रेते शंकर चेचर उपस्थित होते.
उद्घाटनानंतर रक्त संकलनास सुरुवात झाली. समाजकार्याची सुरुवात स्वत:पासून करत ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी आधी रक्तदान केले. त्यानंतर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह पक्ष, संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिरात उत्स्फूर्तपणे हजेरी लावत रक्तदान केले. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ४२ जणांनी रक्तदान केले. या उपक्रमासाठी शाहू ब्लड बँकेचे प्रसिद्धीप्रमुख धर्मराज लवटे, संभाजी पोवार, लता निकम, जयश्री करजगार, प्रमोद मंगसुळे, आनंद गायकवाड, शरद पाटील, संदीप कंदले, गफूर जमादार यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)