माद्याळमध्ये लक्षवेधी लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST2021-01-13T05:00:49+5:302021-01-13T05:00:49+5:30

सेनापती कापशी : माद्याळ (ता. कागल) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होत असून कागल तालुक्यातील सर्वांत लक्षवेधी लढत ...

A spectacular fight in Madal | माद्याळमध्ये लक्षवेधी लढत

माद्याळमध्ये लक्षवेधी लढत

सेनापती कापशी : माद्याळ (ता. कागल) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होत असून कागल तालुक्यातील सर्वांत लक्षवेधी लढत या ठिकाणी होत आहे. कागल तालुक्यातील प्रमुख चारही गटातील पहिल्या फळीतील नेत्यांचा याठिकाणी कस लागणार आहे. याठिकाणी मंडलिक-मुश्रीफ युती विरुद्ध संजय घाटगे - समरजित घाटगे युतीमध्ये लढत होत असली तरी श्री भावेश्र्वरी परिवर्तन अघाडीच्या माध्यमातून तिसरी आघाडी निर्माण झाली असून या तिसऱ्या आघाडीनेही प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे. पंचायत समितीचे उपसभापती दीपक सोनार यांची भूमिका या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे. या ठिकाणी एकूण चार प्रभाग असून अकरा जागांसाठी मतदान होणार आहे. सुमारे चार हजार मतदार उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. प्रचारात तीनही आघाडीनी जोर धरला असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून भूमिका पटवून सांगितली जात आहे. श्री.भावेश्र्वरी (अंबाबाई) ग्रामविकास अघाडीचे नेतृत्व तालुका संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे व पं. स.चे माजी सभापती मारुती चोथे करत आहेत. छत्रपती शाहू पॅनेलचे नेतृत्व माजी जि. प. उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे व शाहूू साखरचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, तर श्री भावेश्र्वरी परिवर्तन आघाडीचे नेतृत्व आनंद ढोणुक्षे, दत्ता कामते, आर. के. चौगले, वसंत पाटील, आदी करत आहेत. कागल तालुक्यातील प्रमुख चारही गटातील पहिल्या फळीतील नेत्यांचा याठिकाणी कस लागणार आहे. येथील निवडणुकीकडे कागल तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: A spectacular fight in Madal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.