Special Interview: Intellectual Property of Indians Abroad for the Country: Due to Dnyaneshwar | स्पेशल मुलाखत :  विदेशातील भारतीयांची बौद्धिक संपदा देशासाठी : ज्ञानेश्वर मुळे

स्पेशल मुलाखत :  विदेशातील भारतीयांची बौद्धिक संपदा देशासाठी : ज्ञानेश्वर मुळे

ठळक मुद्दे स्पेशल मुलाखत :  विदेशातील भारतीयांची बौद्धिक संपदा देशासाठी : ज्ञानेश्वर मुळेप्रभासच्या व्यासपीठावर जगातील दीड हजार भारतीय एकत्र

संदीप आडनाईक 

कोल्हापूर : प्रभास या आंतरमंत्रालयीन उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूरचे सुपुत्र, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची निवड झालेली आहे. त्यांच्या या नव्या कामाविषयी जाणून घेण्यासाठी हा संवाद.

प्रश्न : प्रभास समिती म्हणजे नेमके काय ?

उत्तर : कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रिअल रिसर्चमार्फत स्थापन केलेल्या ह्यप्रवासी भारतीय सायंटिफिक ॲण्ड अकॅडेमिक संपर्कह्ण अर्थात प्रभास ही भारत सरकारची समिती आहे. विदेशातील भारतीय शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, विशेषज्ञ, स्कॉलर्स यांना तसेच भारतातील तज्ज्ञ, विशेषज्ञ, शास्त्रज्ञ यांना एकत्र आणून भारतातील समस्यांसाठी एकत्रित काम करण्यासाठी तयार केलेले पोर्टल म्हणून ह्यप्रभासह्ण काम करणार आहे. याचे कार्यक्षेत्र संपूर्ण जगभर आहे.

प्रश्न : प्रभास पोर्टलमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे?

उत्तर : जगभरात सुमारे तीन कोटी भारतीय वंशाच्या व्यक्ती आणि अनिवासी भारतीय राहतात. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यवसाय, व्यवस्थापन आणि वित्तीय क्षेत्रांत काम करणाऱ्या आणि परदेशात त्या त्या क्षेत्रात नाव कमावलेल्या या व्यक्तींना आणि शास्त्रज्ञांना प्रभासच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आणले आहे. प्रभासमध्ये डीआरडीओ, इस्रो, ऑटोमिक एनर्जी कमिशन, आयसीएआर, आयसीएमआर, सीएसआयआरचे वरिष्ठ अधिकारी यांसारख्या भारतातील सगळ्या प्रमुख वैज्ञानिक प्रयोगशाळा, कौन्सिल्स आणि संस्था या समितीचे सदस्य आहेत. याशिवाय विदेश मंत्रालय तसेच विज्ञान, तंत्रज्ञान मंत्रालयाचा यात मोठा सहभाग आहे.

प्रश्न : प्रभासचे नेमके काम काय असणार आहे ?

उत्तर : आतापर्यंत विदेशांतील शास्त्रज्ञांचा भारतासाठी फार कमी उपयोग केला गेला. आता या व्यासपीठामुळे भरीव मदत उपलब्ध होणार आहे. शिवाय कोणता प्रकल्प कोण करीत आहे, याची माहितीही एकाच वेळी समजणार आहे. यामुळे देशाच्या प्रकल्पांमध्ये एकवाक्यता येईल.

प्रश्न : प्रभासच्या पहिल्या बैठकीत काय ठरले ?

उत्तर : भारत सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या समितीचे काम चालणार आहे. पर्यावरण, आरोग्य आणि गरिबी या तीन प्रमुख समस्यांवर उपाययोजना शोधणे हे या समितीचे प्रमुख काम आहे. २२ ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने पहिली बैठक झाली. त्यात या पोर्टलची प्रगती काय झाली, याचा आढावा घेतला. जगातील १५०० निमंत्रितांपैकी १९१ विदेशी भारतीय शास्त्रज्ञ आणि अनिवासी भारतीय उपस्थित होते.

प्रश्न : याद्वारे थेट आर्थिक लाभ देण्याची योजना आहे का ?

कोणत्याही व्यक्तीला आर्थिक लाभ मिळण्याऐवजी बौद्धिक संपदेच्या आधारे देशासाठी पर्यावरण, सामाजिक, आर्थिक यांसारख्या समस्यांवर उपाय शोधले जातील आणि भारत जगभरात अग्रणी ठरण्यासाठी पुढाकार घेईल, असा प्रयत्न या समितीच्या माध्यमातून होणार आहे. यातून केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशाला बळ मिळणार आहे. मी महाराष्ट्रात केलेल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी घेऊन ही समिती कार्यरत होईल.


प्रगल्भ आणि वैज्ञानिक बुद्धीचा वापर करून भारतीयांच्या समस्यांवर उपाययोजना शोधणाऱ्या प्रदीर्घ प्रकल्पांची निर्मिती प्रभासच्या समितीमार्फत करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. ज्ञानेश्वर मुळे

Web Title: Special Interview: Intellectual Property of Indians Abroad for the Country: Due to Dnyaneshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.