‘नगररचना’चा विशेष कॅम्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:38 IST2021-02-23T04:38:43+5:302021-02-23T04:38:43+5:30

कोल्हापूर : महानगरपालिका नगररचना विभागामार्फत आज, मंगळवारपासून दोन दिवस घेण्यात येणारा बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा विशेष कॅम्प आता मार्च ...

A special camp for town planning in the first week of March | ‘नगररचना’चा विशेष कॅम्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात

‘नगररचना’चा विशेष कॅम्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात

कोल्हापूर : महानगरपालिका नगररचना विभागामार्फत आज, मंगळवारपासून दोन दिवस घेण्यात येणारा बांधकाम भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा विशेष कॅम्प आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केला आहे.

नगररचना विभागाकडील बहुतांश अधिकारी व कर्मचारी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूूक अंतर्गत प्रारुप मतदार याद्या तयार करण्यात येत असलेल्या कामकाजाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामकाज बुधवार, दि. ३ मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आज, मंगळवारपासून दोन दिवस आयोजित केलेला विशेष कॅम्प स्थगित करण्यात आला आहे. हा कॅम्प आता गुरुवार, दि. ४ व ५ मार्च रोजी होणार आहे.

नगररचना विभागाशी ज्या नागरिक, व्यावसायिक यांनी बांधकाम भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज दिले आहेत त्यांनी नगररचना विभागामध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आवश्यक असलेले शुल्क भरून घेऊन आपले बांधकामाचे नियमित करून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन नगररचना विभागामार्फत करण्यात आले आहे.

Web Title: A special camp for town planning in the first week of March