सोर्टूर हल्ला; कारवाईची मागणी

By Admin | Updated: October 31, 2014 23:47 IST2014-10-31T23:46:28+5:302014-10-31T23:47:03+5:30

अथणी : मिरज शहरात डॉ. शिवानंद सोर्टूर यांच्यावर हल्ला करून रुग्णालयात नासधूस केलेल्यावर कारवाई करावी,

Sotour attack; Action demand | सोर्टूर हल्ला; कारवाईची मागणी

सोर्टूर हल्ला; कारवाईची मागणी

अथणी : मिरज शहरात डॉ. शिवानंद सोर्टूर यांच्यावर हल्ला करून रुग्णालयात नासधूस केलेल्यावर कारवाई करावी, अशी मागणी आय. एम. ए. अथणी तालुका अध्यक्षा डॉ. विश्वनाथ कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत केली. ते म्हणाले, त्या डॉक्टरवर हल्ला करणे चुकीचे असून संबंधित डॉक्टरची त्यामध्ये काहीही चूक नाही. सांगली जिल्ह्यात डॉक्टरांनी एक दिवस पुकारलेल्या संपास आमचा पाठिंबा आहे. त्या दिवशी अथणीत काळ्या फिती लावून काम करणार आहे. यावेळी डॉ. महेश तेरदाळ, डॉ. मल्लिकार्जुन हंजे, डॉ. पी. बी. कुलकर्णी, डॉ. ए. ए. पांगी, डॉ. अरविंद चौगला, डॉ. आनंद कुलकर्णी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sotour attack; Action demand