शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

जन्म होताच आई म्हणाली ‘नको मला बाळ..!!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:48 IST

ती सज्ञान असली तरी कुमारी माता. कोल्हापूरच्या वेशीवरील सीमाभागातील गावातील. बाळंतपणासाठी ती सीपीआर रुग्णालयात दाखल झाली. नैसर्गिक प्रसूती झाली. गुटगुटीत बाळ जन्माला आले; परंतु ते जन्माला येताच चक्क आईच म्हणाली, ‘डॉक्टरसाहेब, मला नको ते बाळ... त्याचा सांभाळ मी कसा करू?...’ या बाळाचे नक्की काय करायचे असा प्रश्न गेले नऊ दिवस सीपीआर प्रशासनाला भेडसावत होता.

ठळक मुद्देजन्म होताच आई म्हणाली ‘नको मला बाळ..!!’‘सीपीआर’मधील प्रसंग : चिमुकल्याचे काय करायचे हा प्रश्न

कोल्हापूर : ती सज्ञान असली तरी कुमारी माता. कोल्हापूरच्या वेशीवरील सीमाभागातील गावातील. बाळंतपणासाठी ती सीपीआर रुग्णालयात दाखल झाली. नैसर्गिक प्रसूती झाली. गुटगुटीत बाळ जन्माला आले; परंतु ते जन्माला येताच चक्क आईच म्हणाली, ‘डॉक्टरसाहेब, मला नको ते बाळ... त्याचा सांभाळ मी कसा करू?...’ या बाळाचे नक्की काय करायचे असा प्रश्न गेले नऊ दिवस सीपीआर प्रशासनाला भेडसावत होता. गुरुवारी सायंकाळी त्यातून मार्ग निघाला. आता हे बाळ आवश्यक सोपस्कार करून  बालकल्याण संकुलाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.परिस्थितीपुढे माणूस अनेकदा पराभूत होतो, तसाच प्रसंग या मातेवर ओढवला असून, नऊ महिने पोटात सांभाळलेला हा मायेचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची वेळ तिच्यावर आली आहे. ही महिला स्वत:हून ४ फेब्रुवारीस‘ सीपीआर’मध्ये दाखल झाली.

लगेच दुसऱ्या दिवशी तिची व्यवस्थित प्रसूती झाली. त्यामुळे तीन दिवसांनंतर बाळ-बाळंतिणीची तपासणी केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली; परंतु तिने बाळाला स्वीकारण्यास नकार दिल्यावर बाळाची जबाबदारी घ्यायची कुणी असा प्रश्न तयार झाला.

निपाणी पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी येऊन जाबजबाब घेतला. परंतु प्रसूती ‘सीपीआर’ला झाल्यामुळे त्यांनी हात वर केले. मग लक्ष्मीपुरी पोलिसांना कळविण्यात आले. त्यांनी घटना मूळची कर्नाटकातील असल्याने आम्ही काय करू? असा पवित्रा घेतला. संबंधित तरुणीच्या वडील व बहिणीला बोलावून घेतले; परंतु त्यांचीही ‘बाळ नको’ अशीच भूमिका.

बालकल्याण संकुलात दाखल झालेल्या बाळाची जबाबदारी संकुल स्वीकारते; परंतु पालक असताना मूल स्वीकारण्यात संस्थेलाही अडचण आली. गुरुवारी दुपारी ‘सीपीआर’मधील एका बैठकीत हा प्रश्न समाजसेवा विभागाच्या अधीक्षकांकडून मांडण्यात आला. त्यावर बरीच चर्चा झाली.

त्यानंतर ‘सीपीआर’ प्रशासनाने आईच्या संमती व स्वाक्षरीसह बाळ नको असे लेखी पत्र द्यायचे व या बाळाची जबाबदारी बालकल्याण संकुलाकडे सुपूर्द करायची असे ठरले. ही प्रक्रिया करण्यात येणार असून हे त्या मातेला असाहाय्यपणे नको असलेले बाळ संकुलाच्या शिशुगृहामध्ये दाखल होईल. रीतसर कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबवून त्याचे नंतर पुनर्वसन होईल. 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर