‘मिका’च्या गाण्याने तरुणाई बेधुंद

By Admin | Updated: July 27, 2014 01:12 IST2014-07-27T00:46:48+5:302014-07-27T01:12:06+5:30

भव्य रॅम्पमुळे बॉलिवूडचा फील : आंतरराष्ट्रीय दर्जाची ध्वनियंत्रणा, डोळे दिपवणारी प्रकाश यंत्रणा

The song 'Mika' is about to be excited | ‘मिका’च्या गाण्याने तरुणाई बेधुंद

‘मिका’च्या गाण्याने तरुणाई बेधुंद

कोल्हापूर : बॉलिवूडचा प्रसिद्ध पॉप सिंगर मिका सिंगची एकाहून एक अफलातून गाणी, अभिनेत्री प्राची देसाई, टी.व्ही कलाकार अनिता हसनंदानी यांचा बहरदार डान्स आणि डी. जे. लेमन, ए. जे. विराट यांच्या संगीतमय साथीमुळे आज, शनिवारची सायंकाळ कोल्हापूरच्या तरुणाईला थिरकायला लावणारी होती.
संजय घोडावत इन्स्टिट्यूट(एसजीआय)आणि केबीएम एंटरटेनमेंट यांच्यावतीने आयोजित करण्यात ‘मिका सिंग लाईव्ह इन कोल्हापूर’ हा कार्यक्रम मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे झाला. यावेळी पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून संयोजकांनी वॉटरपू्रफ मंडप घातला होता. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीचे ध्वनिप्रक्षेपण, मोठा रॅम्प यांच्यामुळे थेट मिका सिंग समोर असल्याने तरुणाईच्या आनंदाला अगदी पारावारच उरला नाही. अभिनेत्री प्राची देसाई, अनिता हसनंदानी यांच्या नृत्याचा आनंद थेट तरुण मंडळींनी घेतला, तर अनुषा दांडेकर हिच्या बहरदार निवेदनाने तरुणाईच्या अपेक्षाच वाढत चालल्या होत्या.
मिका सिंगने थेट तरुणाईच्या काळजाला हात घालत ‘कसं काय कोल्हापूरकर, बरं हाय का’ असे म्हणत थेट मराठीतून संवाद साधला. सुरुवातीच्या गाण्यांमध्ये ‘दमादम मस्त कलंदर’ या गाण्याने तरुणाईला अगदी बेहोष करून टाकले; तर मिकाच्या साथीला प्राची देसाईच्या नृत्याने अगदी चार चॉँद लावले. उतरोत्तर रंगत चाललेल्या या पॉप गाण्यांमध्ये मिकाने ‘चुरा लिया है तुमने सनम,’ देसी बॉईजमधील ‘सुबह होने लगी, एजंट विनोदमधील ‘पुंगी,’ हाऊसफुल्ल या चित्रपटातील ‘धनो’ आणि इंग्रजी आणि हिंदीचे मिक्सिंग गाणे मुव्ही गो यांनी रंगत आणली. मिका सिंगच्या पंजाबी गाण्यांना ढोलकीची साथ देणाऱ्या कुलदीपसिंग, तारीक भाटिया व लव्हलीसिंग यांनी ‘चुरा लिया तुमने जो दिल को’ हे गाणे गाऊन या कार्यक्रमात आणखी रंगत आणली; तर अनुषा दांडेकरच्या बहरदार निवेदनाने कार्यक्रमाचा गोडवा वाढविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजक सत्त्वशील माने यांना मिका सिंग यांनी स्टेजवर बोलावून त्यांच्याबरोबर एक गाणे गायिले. (प्रतिनिधी)
 

Web Title: The song 'Mika' is about to be excited