राधानगरी पंचायत समिती सभापतिपदी सोनाली पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:50+5:302021-07-30T04:26:50+5:30
राधानगरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच, राष्ट्रीय काँग्रेसच्या चार, तर शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या ...

राधानगरी पंचायत समिती सभापतिपदी सोनाली पाटील बिनविरोध
राधानगरी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पाच, राष्ट्रीय काँग्रेसच्या चार, तर शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या सूत्रानुसार सभापती वंदना हळदे यांनी राजीनामा दिला होता. निवडसभेसाठी उपसभापती वनिता पाटील, दिलीप कांबळे, रविश पाटील, मोहन पाटील, उत्तम पाटील, दीपाली पाटील, कविता मोरे, सुशीला भावके, आदी सदस्य उपस्थित होते. सोनाली पाटील यांच्या निवडीमुळे सोळांकुर गावाला बत्तीस वर्षांनंतर सभापती पदाची संधी मिळाली आहे. यावेळी आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भिकाजी हळदकर, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, सविता चौगले, आर. के. मोरे, आर. वाय. पाटील, फिरोजखान पाटील, युवराज वारके, एकनाथ पाटील, भिकाजी एकल, वाय. डी. पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी, समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ-
राधानगरी पंचायत समितीच्या सभापतिपदी सोनाली पाटील यांच्या निवडीनंतर सभागृहात सत्कार करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व इतर पदाधिकारी.
चौकट
महिलाराज..
राधानगरी पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच दोन महिलांना सभापती व उपसभापती पदांवर काम करण्याची संधी मिळाली. सभापतिपदी सोनाली शिवाजी पाटील व उपसभापतिपदी वनिता भरत पाटील यांची निवड झाली आहे.