शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Kolhapur Crime: दारूला पैसे दिले नसल्याच्या रागातून आईचा वरवंट्याने ठेचून खून, खुनी मुलाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:38 IST

दारूच्या नशेत मुलाचे कृत्य, राजेंद्रनगर येथील धक्कादायक घटना 

कोल्हापूर : दारूला पैसे देत नसल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठेचून तिचा निर्घृण खून केला. हा प्रकार बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरात भारतनगरमध्ये घडला. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे मृत महिलेचे नाव असून, हल्लेखोर मुलगा विजय अरुण निकम (वय ३५) याला राजारामपुरी पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. घटनास्थळ आणि राजारामपुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई निकम आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघेच भारतनगर येथली घरात राहत होते. विजय हा व्यसनी असल्याने त्याची पत्नी आणि दोन मुली माहेरी विजापूर येथे जाऊन राहिल्या आहेत. सेंट्रिंग काम आणि डिजिटल फलक लावण्याचे काम करणारा विजय सतत दारूसाठी आईला त्रास देत होता. 

बहिणीला फोन करून दिली माहितीआज, बुधवारी सकाळी दारूच्या नशेत तो आईकडे पैसे मागत होता. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने घरातील वरवंटा डोक्यात घालून आईचा खून केला. त्यानंतर त्यानेच इस्पुर्ली येथील बहिणीला फोन करून आईचा खून केल्याची माहिती दिली. शेजा-यांनाही घटनेची माहिती देऊन तो दारात बसला होता.

परिसरातील नागरिकांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी येऊन हल्लेखोर विजय निकम अटक करून घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Son Murders Mother with Grinding Stone Over Alcohol Money

Web Summary : In Kolhapur, a son killed his mother with a grinding stone after she refused to give him money for alcohol. The incident occurred in Rajendranagar. The accused, Vijay Nikam, has been arrested by Rajarampuri police after informing his sister about the crime.