माती परीक्षण ही काळाची गरज : पी. आय. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:22 IST2021-02-07T04:22:30+5:302021-02-07T04:22:30+5:30
यावेळी त्यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा प्रतिनिधिक नमुना कसा घ्यावा, माती परीक्षणानुसार पीकनिहाय जोरखते व भरखते कशी दयायची, ...

माती परीक्षण ही काळाची गरज : पी. आय. पाटील
यावेळी त्यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, मातीचा प्रतिनिधिक नमुना कसा घ्यावा, माती परीक्षणानुसार पीकनिहाय जोरखते व भरखते कशी दयायची, याचे मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी एन. डी. भांडवले यांनी कीटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी व त्याचे होणारे दुष्परिणाम, कृषी विभागाच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी सहायक एस. डी. इंगळे, आर. जी. मोरे, पी. बी. कारभारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विकास बजबळकर, माजी सरपंच अरुण बेलेकर, उत्तम फगरे, बाबासाहेब भोसले, सचिन बेलेकर, शशिकांत बुडके व ग्रामस्थ उपस्थित होते. तंटामुक्ती समिती अध्यक्ष वसंत मंगाज यांनी आभार मानले.