सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सामाजिक-आर्थिक समावेशन अत्यावश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST2021-09-11T04:25:48+5:302021-09-11T04:25:48+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेतील अंतिम चौथे पुष्प त्यांनी गुंफले. ‘भारतातील संवर्धनीय शाश्वतता व डिजिटल संधींचे ...

सर्वांगीण विकासासाठी महिलांचे सामाजिक-आर्थिक समावेशन अत्यावश्यक
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेतील अंतिम चौथे पुष्प त्यांनी गुंफले. ‘भारतातील संवर्धनीय शाश्वतता व डिजिटल संधींचे नवनिर्माण’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात प्रमुख उपस्थित होते. विकासाच्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर जास्तीत-जास्त विचारपूर्वक आणि सांभाळून करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे त्यांची कमीत कमी हानी करणे आणि झालेली हानी भरून काढणे, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विकसकांनी तत्पर असायला हवे. संवर्धनशील फिरती अर्थव्यवस्था अंगिकारली पाहिजे. अर्थात उत्पादनाचा वापर झाल्यानंतर त्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पुन्हा उत्पादन प्रक्रियेशी जोडले जाणे आवश्यक असल्याचे आर. मुकुंदन यांनी सांगितले. अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले.
सजग पिढी घडविण्याची गरज
समतोल सामाजिक-आर्थिक विकास, संवर्धनशीलता, नैसर्गिक संसाधनांचा पुनर्वापर, जैवविविधतेचे संरक्षण अशा सर्वंकष बाबींचा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून समावेश व्हावा. त्याव्दारे सजग आणि जाणिवासमृद्ध भावी पिढी घडविण्याची आज मोठी गरज असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले.
फोटो (१००९२०२१-कोल-आर मुकुंदन (युनिर्व्हेसिटी)
100921\10kol_2_10092021_5.jpg
फोटो (१००९२०२१-कोल-आर मुकुंदन (युनिर्व्हेसिटी)