शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून मी कागलच्या एका बोळात असलेल्या साध्या घरात राहतोय - मंत्री हसन मुश्रीफ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:45 IST

शीशमहाल आणि कागलचा बोळ

मुरगूड : सर्वसामान्यांना जे मिळाले नाही ते देण्यासाठीच समाजकारण, राजकारणाचा उपयोग केला म्हणूनच मी नऊ वेळा मंत्री म्हणून शपथ घेतली. मिळालेल्या वैद्यकीय शिक्षण खात्याचा वापर करून शासनाच्या सर्व योजना कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावी राबवून जिल्ह्याला मेडिकल हब मेडिकल टुरिझम करणार असल्याचा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.मुरगूड (ता. कागल) येथे बांधकाम कामगार कार्यलयाचा शुभारंभ व अटल घरकूल योजनेअंतर्गत नागरिकांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आकस्मित मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांना आर्थिक मदत वितरीत केली. शिवाय २८ लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख प्रमाणे ५६ लाखांचा निधी घरकूल बांधण्यासाठी दिल्याचे प्रमाणपत्र वितरीत केले. बांधकाम कार्यलयाचे उद्घाटन मुश्रीफांच्या हस्ते झाले.मुश्रीफ म्हणाले, राज्याच्या तिजोरीला हात न लावता आपण बांधकाम कामगार महामंडळाची स्थापना केली. सध्या या मंडळाकडे चौदा हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातून कामगारांना लाभ मिळतात. एका वर्षात कागल तालुक्यात ३० कोटी शिष्यवृत्ती मिळाल्याचे ही त्यांनी सांगितले. सहा कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर, बीडीओ कुलदीप बोन्गे यांनी घरकूल योजनेची माहिती दिली.यावेळी वीरेंद्र मंडलिक, दिग्विजय पाटील, डी.डी.चौगले, रंगराव पाटील, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, देवानंद पाटील, सुनील चौगले, राजू आमते, नामदेव भांदिगरे, अमर देवळे, जयसिंग भोसले, सत्यजीत चौगले, रणजीत मगदूम, दिगंबर परीट, राजाराम गोधडे, दत्तात्रय मंडलिक, गब्बर भारमल, आकाश आमते आदी उपस्थित होते.

शीशमहाल आणि कागलचा बोळदिल्लीमध्ये आपची सत्ता गेली, याला एकमेव कारण म्हणजे केजरीवाल यांनी स्वतःसाठी बांधलेला शिशमहाल. लोकांना हे आवडले नाही, म्हणून केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला. यासाठी मी अजून ही कागलच्या एका बोळात असलेल्या साध्या घरात राहतोय, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगत नेत्यांनी साधी राहणी व उच्च विचारसरणी ठेवावी लागते, अशी पुष्टीही त्यांनी दिली.अडीच लाख मुलींना लस देणार..कर्करोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख मुलींना गर्भाशय व ब्रेस्ट कॅन्सर होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक लस देण्याचा मानस असून, यासाठी सामाजिक सेवाभावी संस्थेचा आधार घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलHasan Mushrifहसन मुश्रीफHomeसुंदर गृहनियोजन