आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक रूग्ण बरे होऊन घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:47 IST2020-09-29T13:44:56+5:302020-09-29T13:47:54+5:30
कोरोनाचा संसर्ग झालेले असे तब्बल ३२ हजार ३१२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेले सहा महिने शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विभाग आणि खासगी डॉक्टर्स, कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांतून ७४ टक्क्यांहून अधिक रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आता ९७५३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत ३२ हजारांहून अधिक रूग्ण बरे होऊन घरी
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग झालेले असे तब्बल ३२ हजार ३१२ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गेले सहा महिने शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विभाग आणि खासगी डॉक्टर्स, कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांतून ७४ टक्क्यांहून अधिक रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आता ९७५३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
मार्चपासून कोरोनाच्या संसर्गाला देशभरात सुरूवात झाली तरी कोल्हापूर जिल्ह्यात मार्चमध्ये एकही रूग्ण सापडला नाही. एप्रिल, मे आणि जून महिन्यातही तुलनेत प्रमाण कमी राहिले. २७७१० स्राव चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी केवळ ८४८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजे या तीन महिन्यांमधील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट फक्त ६.८९ टक्के इतका होता. या तीन महिन्यांतील रूग्णांपैकी ७२३ जणांना डिस्चार्ज दिल्याने रिकव्हरी रेट तब्बल ९४.५९ टक्क्यांवर पोहोचला.
जुलैमध्ये मात्र ही संख्या ५४६२ वर गेली. पॉझिटिव्हिटी रेट तिप्पट झाला आणि रिकव्हरी रेट एकदम ३८.६७ टक्क्यांवर आला. ऑगस्टमध्ये ही संख्या वाढतच गेली आणि तब्बल १७ हजार ७७८९ म्हणजे २८.५७ टक्के जणांना कोरोनाची लागण झाली. परंतु रिकव्हरी रेट वाढून तो ६८ टक्क्यांपर्यंत पोहोचला.
ऑगस्टपेक्षाही सप्टेंबरमध्येही संख्या अधिकच वाढत गेली. गेल्या पाच, सहा दिवसांत संख्या कमी येताना दिसत असली तरी सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात रूग्णांची संख्या प्रचंड वाढली. हा महिना संपला नसताना २७ सप्टेंबरपर्यंत १९४८२ रूग्ण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्हीटी रेट ४०.८४ टक्के झाला आहे. त्याच प्रमाणात बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून १७४२५ रूग्ण बरे झालेले आहेत. रिकव्हरी रेट ८९.४४ टक्के इतका आहे.
कोरोनाविषयक आकडेवारी
- सरासरी पॉझिटिव्हीटी रेट २४.२० टक्के
- ॲक्टिव्ह केसचा रेट २२.४५ टक्के
- बरे होण्याचा दर ७४.४ टक्के
- मृत्युदर ३.२ टक्के
- संपर्क शोध दर एका रूग्णामागे ७.७८
- रूग्ण दुप्पट होण्याचे दिवस ४९.४ दिवस
- आतापर्यंत केलेल्या चाचण्या १ लाख ७९ हजार ५०२
- निगेटिव्ह अहवाल १ लाख ३४ हजार ९९
- पॉझिटिव्ह ४३४४३
- रिपिट सॅम्पल ४६७
- रिजेक्ट १४९३
महिना पॉझिटिव्ह रूग्ण
- मार्च ०२
- एप्रिल १२
- मे ५९३
- जून २४३
- जुलै ५,४६२
- ऑगस्ट १७,७७८
- १ ते २७ सप्टेंबरपर्यंत् १९,४८२