शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: हलगीचा कडकडाट, शक्तिप्रदर्शनाने जत्रेचे स्वरुप; १७० अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 12:24 IST

प्राथमिक छाननीलाच वेळ, कार्यकर्त्यांच्या गर्दीने रस्ते फुलले 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी शहरातील ८१ प्रभागांसाठी १७० अर्ज दाखल झाले. आतापर्यंत १९९ अर्ज दाखल झाले आहेत. शहरातील सर्वच्या सर्व सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या गर्दीसह शक्तिप्रदर्शन करत त्यांचे अर्ज भरले. आज, मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या १५ जानेवारीला होत असून राजकीय पक्षाची उमेदवारी मिळविण्यात झालेली प्रचंड चढाओढ पाहता आणि नेतेमंडळींकडून राजकीय रणनीती आखताना घेतली जात असलेली खबरदारी पाहता ही निवडणूक कमालीची चुरशीची होणार, हे उघड आहे.अर्ज दाखल करण्याचा आज, मंगळवारी शेवटचा दिवस असतानाही महायुतीतील घटक पक्षांनी त्यांच्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिले नसल्याने या पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या सर्वच उमेदवारांनी एक अपक्ष व एक पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज भरले. काहींनी दोन, काहींनी तीन, तर काहींना चार अर्ज दाखल केले. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), आप, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांना ‘एबी फॉर्म’ दिल्याने त्यासह त्यांनी अर्ज भरण्यास सुरवात केली. आतापर्यंत २१८५ अर्जांची विक्री झाली आहे.दिवसभर सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये फुलून गेली. पक्षाचे स्कार्प, टोप्या, छातीवर बिल्ले लावलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने अर्ज भरण्यास गेले होते. गटागटाने कार्यकर्ते आल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी तर सवाद्य मिरवणुकीने जाऊन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती.सोमवारी दुपारी एकनंतर अनेक उमेदवार कार्यालयात पोहोचल्यानंतर तेथे गर्दी झाली. त्यामुळे प्राथमिक छाननीसह अर्ज सादर करण्यास विलंब होत होता. व्ही. टी. पाटील सभागृहात तर दुपारी तीनची वेळ संपल्यानंतरही पुढे दोन अडीच तास ही प्रक्रिया सुरू होती. महासैनिक दरबार हॉल, यशवंतराव चव्हाण हॉल दसरा चौक, ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथील कार्यालयांतही अशीच परिस्थिती होती. दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचलेल्या उमेदवारांना टोकन देऊन नंतर जशी प्रक्रिया करून पुढे येतील तसे अर्ज दाखल होत होते.

प्राथमिक छाननीलाच वेळअर्ज दाखल करतेवेळी आधी उमेदवारांनी भरलेला अर्ज, त्यासोबत जोडलेली कागदपत्रे योग्य आहेत की नाही. काही कागदपत्रे जोडायची राहिली आहेत का, याची छाननी केली जाते. त्यासाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण केले आहेत. या छाननीला वेळ लागत असल्याने अर्ज दाखल करून घेण्यास वेळ लागत आहे.

कडकडाट हलगीचा...बावड्याने अनुभवला माहोल जत्रेचाकोल्हापूर : हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, घोषणा अशा आवेषपूर्ण वातावरणाचा माहोल सोमवारी महासैनिक दरबार हॉल परिसराने अनुभवला. निमित्त होते महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे. सोमवारी एका दिवसांत प्रभाग क्रमांक १, २ व ५ मधील १३ उमेदवारांनी मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसकडून माजी महापौर स्वाती यवलुजे, माजी उपमहापौर अर्जुन माने, विनायक कारंडे यांनी अर्ज दाखल केले. हलगी, घुमक्याच्या निनादात या पदयात्रा निघाल्याने कसबा बावडा, लाईन बाजार परिसराला अक्षरश यात्रेचे स्वरूप आले होते.वकिलांचीही गर्दीउमेदवारी अर्जात चुका राहू नये यासाठी उमेदवार वकिलांना घेऊन अर्ज भरण्यासाठी जात होते. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराकडे दोन दोन वकिलांची टीम होती. काही पक्षानेही वकील नेमले आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी हे वकील दोन-तीन वेळा अर्जाची तपासणी करत होते.वास्कर, मुतगी, केसरकर, रूपाराणी निकम यांचे अर्जकोल्हापूर : हॉकी स्टेडियमच्या निवडणूक कार्यालयात एकूण ३७ जणांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वॉर्ड क्रमांक १६ मधून भाजपचे विलास वास्कर, मुरलीधर जाधव, काँग्रेसचे उमेश पोवार, धनश्री कोरवी यांनी प्रामुख्याने अर्ज दाखल केले. प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपकडून रवींद्र मुतगी आणि काँग्रेसकडून प्रवीण केसरकर यांनी अर्ज दाखल केले. वार्ड क्रमांक १८ मधून प्रामुख्याने भाजपकडून स्वाती कदम, रूपाराणी निकम आणि काँग्रेसकडून सर्जेराव साळोखे यांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रमुख दावेदारांच्या घरातील तीन, चार जणांनी आपले अर्ज दाखल करून ठेवले आहेत.नाईकनवरे, परमार, समर्थसह आजरेकरांनी दाखल केला अर्जकोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी शहाजी कॉलेज येथील निवडणूक कार्यालयाकडे सोमवारी एकाच दिवशी प्रभाग क्रमांक १२,१३,१४ मधून ३३ जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, ईश्वर परमार, अमर समर्थ यांच्यासह आस्कीन आजरेकर, पूजा शेटे, प्रेमा डवरी आदींचा समावेश आहे. आतापर्यंत तिन्ही प्रभागातील १२ जागांसाठी ३८ जणांनी अर्ज दाखल केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election 2026: Rallies mark nominations; 170 applications filed.

Web Summary : Kolhapur witnessed a surge in nominations for the upcoming municipal elections, with 170 applications filed on Monday. Party alliances are still undecided on candidates, leading to multiple filings. Large rallies and processions accompanied the submissions as today is the deadline.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६