शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

औषधांसाठी लागणाऱ्या केमिकलच्या नावाखाली मद्याची तस्करी, कोल्हापुरात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 19:20 IST

केमिकलच्या बिलांबद्दल विचारणा केल्यानंतर उडाला गोंधळ

उद्धव गोडसेकोल्हापूर : औषधांसाठी लागणा-या केमिकलची वाहतूक करीत असल्याचे भासवत गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला. १४ लाखांचे मद्य आणि ट्रक असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाक्यावर आज, मंगळवारी (दि. १५) दुपारी ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. इब्राहीम हकीम खान (वय २२) आणि सत्तार मिठा खान (२७, रा. आत्मज अगडवा, जि. जालोर, राजस्थान) अशी या दोघांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, गोवा बनावटीचे मद्य घेऊन एक ट्रक पुण्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती एलसीबीचे हावलदार सुरेश पाटील आणि आसिफ कलायगार यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह विनायक सपाटे आणि त्यांच्या पथकाने पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ सापळा रचला.संशयित ट्रक चालक इब्राहीम खान आणि सत्तार खान यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी केमिकलचे बॉक्स असल्याचे सांगितले. मात्र केमिकलच्या बिलांबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांचा गोंधळ उडाला. ट्रकची तपासणी केल्यानंतर पोलिसांना गोवा बनावटीच्या मद्याचे १४ लाख १ हजार ७२० रूपये किंमतीचे ३९४ बॉक्स मिळाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस