शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मनीष नागोरीला पिस्तुले पुरवणाऱ्या तस्कराला मध्यप्रदेशात ठोकल्या बेड्या, एलसीबीच्या पथकाने १० दिवस तळ ठोकून केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:58 IST

चार पिस्तुले जप्त 

कोल्हापूर : कुख्यात शस्त्रतस्कर मनीष रामविलास नागोरी (वय ३६, रा. यड्राव, ता. शिरोळ) याला पिस्तुलांचा पुरवठा करणाऱ्या मध्यप्रदेशातील तस्कराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात जाऊन बेड्या ठोकल्या. सरनाम नाहरसिंह बरनाला (२८, रा. सिंगनूर, ता. गोगाव, जि. खरगुण, राज्य मध्यप्रदेश) असे अटकेतील सराईत तस्कराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीची चार पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईतून कोल्हापुरातील शस्त्रतस्करीचे मध्यप्रदेश कनेक्शन उघडकीस आले आहे.पिस्तूल आणि अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात १५ दिवसांपूर्वी शहापूर पोलिसांनी कुख्यात शस्त्रतस्कर मनीष नागोरी याला अटक केली होती. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. नागोरीची चौकशी करून सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक शस्त्रतस्करीचा उलगडा करण्यासाठी मध्यप्रदेशातील खरगुण जिल्ह्यात गेले होते. तिथे बुऱ्हाणपूर परिसरात तळ ठोकून या पथकाने शस्त्रपुरवठादार सरनाम बरनाला याचा माग काढला. रविवारी (दि. १५) एका हॉटेलजवळ शस्त्रविक्रीसाठी आलेल्या सरनामला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चार पिस्तुलांची पिशवी टाकून त्याने धूम ठोकली होती.स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाघ यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २०) मध्यप्रदेशातील बिस्टान पोलिस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रतस्कर सरनामला अटक केली. अधिक चौकशीत त्याने मनीष नागोरी याला शस्त्रांचा पुरवठा केल्याची कबुली दिली. कोल्हापुरात आणून न्यायालयात हजर केले असता, त्याला मंगळवारपर्यंत (दि. २४) पोलिस कोठडी मिळाली. आजवर त्याने किती शस्त्रे कोल्हापुरात विकली, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.दहा दिवस आरोपीच्या मागावरनागोरी याच्या चौकशीतून मध्यप्रदेशातील तस्कराचे नाव समोर येताच सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार राम कोळी, सुरेश पाटील, रूपेश माने, वैभव पाटील, प्रदीप पाटील, आदींचे पथक मध्यप्रदेशात गेले होते. बुऱ्हाणपूर, खरगुण परिसरात तस्कर बरनाला याचा शोध सुरू होता. एका कारवाईत हुलकावणी देऊन तो पळून गेल्याने पोलिसांची चिंता वाढली होती. अखेर १० दिवसांच्या प्रयत्नांनंतर तो पोलिसांच्या हाती लागला.रॅकेटचा पर्दाफाशशस्त्रतस्करीत अनेकदा मध्यप्रदेश कनेक्शन समोर आले होते. मात्र, त्याच्या मुळाशी पोहोचण्याचे काम झाले नव्हते. गेल्या वर्षी पुण्यातील टोळीयुद्धातून झालेल्या गुन्ह्यानंतर पुणे पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन कारवाया केल्या होत्या. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी केलेली कारवाई महत्त्वाची ठरली. या कारवाईमुळे शस्त्रतस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Police Nab Arms Supplier Linked to Manish Nagori

Web Summary : Kolhapur police arrested a Madhya Pradesh arms supplier, Sarname Barnala, who provided weapons to Manish Nagori. Police seized four pistols and ammunition. The arrest reveals a Kolhapur-Madhya Pradesh arms trafficking connection after a 10 day search operation.