शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

कोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस, कोकणात जाणारी वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 11:55 IST

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात धुवांधार पाऊस, कोकणात जाणारी वाहतूक बंदपन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडीत अतिवृष्टी कायम: बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज आदी तालुक्यात अतिवृष्टी कायम असून, धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. राधानगरीतून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. विविध नद्यांवरील ४0 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिरोळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी वाढले आहे. कुरुंदवाड-जयसिंगपूर रस्ता सकाळी ७.४५ वाजता झार पडल्याने बंद आहे.शनिवारी (दि. २७), रविवारी (दि. २८) कोल्हापुरात पावसाचा जोर काहिसा कमी होता; पण सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला. दिवसभर एकसारखी संततधार सुरु असून धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी धरण ८६ टक्के, तर वारणा ७६ टक्के भरले आहे.कोल्हापूर गगनबावडा मार्गावर, मांडूकली गावाजवळ रस्त्यावर १.५ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कळे मार्गे गगनबावड्याकडे जाणारी वाहतूक, तसेच कोल्हापूर कडून जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे. याशिवाय वैभववाडीकडून कोल्हापूरकडे येणारी वाहतूकही गगनबावडा येथे थांबविण्यात आली आहे. टेकवाडी (ता. गगनबावडा) येथील रस्त्यावर पाणी आल्याने गावाची पूर्णत: वाहतूक बंद आहे. दुसऱ्यांदा हे गाव संपर्काबाहेर गेले आहे.पन्हाळा तालुक्यातही पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. केर्ली येथे कासारी नदीचे पाणी रस्त्यावर आले असून पाण्याची पातळी वाढलेली आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.कुंभी नदीवरील गोठे-परखंदळे पुलावर तीन ते साडेतीन फूट पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. बाजार भोगाव तसेच पोहाळे तर्फ बोरगाव याच्या मध्यभागी कासारी नदीच्या बाजूला अंदाजे तीन फूट पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही बंद आहे मात्र, पोहाळवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरु आहे.चंदगड तालुक्यातही पावसामुळे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी ६.३0 वाजता घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, हिंडगाव, कानडी सावर्डे, आडकूर, कानडेवाडी, तारेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.तालुक्यातील ताम्रपर्णी नदीवरील कुरतनवाडी, हल्लारवाडी हे बंधारेही पाण्याखाली गेले आहेत. बऱ्याच ठिकाणी मार्ग बंद असल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या चंदगड आगाराची चंदगड-हेरे, चंदगड-गवसे, चंदगड -भोगोली, चंदगड- मानगांव, चंदगड- कोनेवाडी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.राधानगरीतून पाण्याच्या विसर्गात वाढराधानगरीतून पाण्याचा विसर्ग वाढला असून, नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे पुलावर पाणी आले आहे, तसेच शेणगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. याबाबत पुर नियंत्रण कक्षास कळविण्यात आले आहे. किटवाड नंबर २ लघु पाटबंधारे तलाव सकाळी ७ वाजता पूर्ण क्षमतेने भरला आहे.कोल्हापूर शहरात पाणीच पाणीकोल्हापूर शहरातही जोरदार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. राजाराम बंधाºयाची पाणी पातळी ३२ फुट ९ इंच इतकी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी गुढघाभर पाणी साचले आहे. यामुळे बहुतेकांनी चारचाकी वाहने बाहेर काढली आहेत, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूकीची कोंडी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणीच पाणी झाले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीची कोंडी झाली आहे. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते उखडले असून पादचारी आणि दुचाकी चालकांना कसरत करावी लागत आहे. पहाटेपासून सुरु असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती, तर काही शाळांना सुटीच देण्यात आली आहे.कळंबा तलाव भरला, मासेमारी जोरातकळंबा तलाव पाण्याचा विसर्ग वाढला असून सांडव्या वरून एक फुटाने पाणी बाहेर पडू लागले आहे. सांडव्यावरून मोठे मासे बाहेर पडू लागल्याने पर्यटकांची मासेमारी जोरात सुरु आहे.अलमट्टी धरण ९५ टक्के भरलेअलमट्टी धरण मंगळवारी ९५ टक्के (११७ टी.एम.सी) भरले असून अलमट्टी धरणामध्ये होनारी आवक ७६000 क्यूसेक व अलमट्टी धरण मधून विसर्ग १0१000 क्यूसेक इतका आहे. कृष्णा नदीमधून होणारा विसर्ग वाढल्यास पुढील विसर्ग वाढविणार आहेत असे अलमट्टी प्रशासन यांनी कळविले आहे.,

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर