स्मशानशेड बांधकामाचे झाले ‘स्मशान’

By Admin | Updated: October 15, 2014 00:30 IST2014-10-15T00:09:08+5:302014-10-15T00:30:16+5:30

मलिदा नसल्याने दुर्लक्ष : निधी असूनही ‘खो’; जिल्ह्यातील १८६ गावांसाठी प्रत्येकी तीन लाख रुपये मंजूर

'Smashan' was built on the building | स्मशानशेड बांधकामाचे झाले ‘स्मशान’

स्मशानशेड बांधकामाचे झाले ‘स्मशान’

भिमगोंडा देसाई -- कोल्हापूर --कमी असलेले ‘बजेट’, जागेचा अभाव, फारसे काही ‘मिळत’ नसल्याने नेतेमंडळींना फिरवलेली पाठ यामुळे निधी मंजूर होऊनही जिल्ह्यातील १८६ गावांमध्ये स्मशानशेड बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा प्रकारच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही स्मशानशेड नसल्याने परवड होत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून जनसुविधा पुरवण्याअंतर्गंत जिल्ह्यातील १८६ गावांसाठी स्मशानशेडसाठी प्रत्येकी तीन लाख रुपये मंजूर होऊन तीन महिने उलटले. मात्र, अद्याप शेडच्या बांधकामाला प्रारंभ झालेले नाही. जागा न मिळणे, ठेकेदारांनी फिरवलेली पाठ, तालुका पातळीवरील उदासीनतेमुळे स्मशानशेड बांधकाम होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी प्रत्येकाला मृत्यूनंतर आठवणाऱ्या स्मशानशेड बांधकामाबाबत ‘नो इंटरेस्ट’ झाला आहे. ‘बजेट’ कमी असल्यामुळे बांधकामाच्या कामात फारसे काही ‘मिळत’ नाही, म्हणून स्मशानशेड पुढारी आणि ठेकेदार यांच्या नावडतीचा विषय झाला आहे.
जिल्ह्यातील १८६ गावांत स्मशानशेड बांधकामासाठी प्रत्येकी तीन लाख रुपये मंजूर झाले आहेत. सर्वसाधारपणे मोठे बजेट असलेल्या कामांचा आराखडा तयार करून घेण्यापासून राजकीय वजन वापरून मंजूर करून घेण्यापर्यंत लोकप्रतिनिधींना अधिक ‘रस’ असतो. या तुलनेत गावात स्मशानशेड बांधकामाचे काम करून घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते. कमी बजेटमध्ये ‘टक्केवारी’ काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या रकमेतून शेड कसे बांधायचे, असा विचार करून वारंवार निविदा काढली तरी ठेकेदार काम घेण्यासाठी पुढे येत नाही. जागा मिळत नाही. स्मशानशेड होणार हे कळताच आजूबाजूच्या लोकांकडून विरोध सुरू होतो. स्वत:हून जागा कोणीही देण्यास पुढे येत नाही. कशाला कोणाशी वाकडेपणा घ्यायचा, अशी मानसिकता करून स्थानिक पातळीवरील पुढारी जागा मिळवून देण्यासाठी फारसे कष्ट घेत नाहीत. त्यामुळेचे स्मशानशेडसाठी निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही हे उघड गुपित आहे. खासगीत बोलताना पंचायत समिती, जिल्हा परिषदेमधील संबंधित विभागांचे अधिकारी वस्तुस्थिती मान्य करतात.


स्मशानशेडसाठी तीन लाख मंजूर झालेली गावे
बेलेवाडी, चिमणे, हालेवाडी, कर्पेवाडी, महागोंड, वझरे, झुलपेवाडी, सोहाळे, देवकांडगाव, इटे, हाळोली, कानोली, कासार कांडगाव, खानापूर, खेडे, किटवडे, कोळिंद्रे, लाकूडवाडी, मेंढोली, निंगुडगे, पारपोली, सुळे, श्रृंगारवाडी (ता.आजरा), एरंडपे खेडगे, कारिवडे, तांबाळे, नवरसवाडी, न्हाव्याचीवाडी, सुतारवाडी, निळपण, पारदेवाडी, बिद्री पेठशिवापूर, बेगवडे, बेडीव, बेडीव पै सावतवाडी, भालेकरवाडी, भेंडवडे, ममदापूर, मानवळे पै केळेवाडी, मिणचे खुर्द, वासनोली, वेंगरूळ, पंडिवरे, बसरेवाडी (ता. भुरदगड), ओलवण, पडळी, बुजवडे, ठिकपुर्ली-ढेरेवाडी, मासुर्ली, कानोली, ऐनी, आमजाई व्हरवडे, सिरसे, हेळेवाडी (ता. राधानगरी), कोतोली, अणुस्कुरा, आलतूर, कांडवण, बजागवाडी, भाडळे, भेंडवडे, डोणोली, हारूगडेवाडी, कापशी, कुंभवडे, माणगाव, पणुद्रे पै. म्हाळसवडे, निळे, परळी, पेंडाखळे (ता. शाहूवाडी), गणेशवाडी, घालवड, जैनापूर, संभाजीपूर, राजापूरवाडी (ता. शिरोळ), मांडुकली, मणदूर, वेतवडे, निवडे, तिसंगी, साखरी, मुटकेश्वर, असंडोली, कोदे बुद्रुक, धुंदवडे, शेळोशी, बावेली (ता. गगनबावडा), चंदूर, पट्टणकोडोली, भेंडवडे, हातकणंगले, अंबप, कापूरवाडी, रूकडी, माणगाव, हेर्ले, (ता. हातकणंगले), बेलेवाडी- काळम्मा, बेनिक्रे, यमगे, अर्जुनवाडा, मळगे बु. , कुरणी, केनवडे, खडकेवाडा, गलगले, तमनाकवाडा, नंद्याळ, पिंपळगाव खुर्द, बाचणी, बेलवळे खुर्द, मांगनूर, व्हनाळी, व्हनूर, सुरूपली (ता. कागल), आमरोळी, बसर्गे, बझवडे, बुक्किहाळ, चिंचणे, दाटे, आंबेवाडी, गवसे, हजगोळी, हेरे, हिंडगाव, होसूर, कडलगे बु., कळसगादे, किटवाड, कोलीक, कोवाड, महिपालगड, म्हाळुंगे खालसा, माणगाव, मिरवेल, मुगळी, नांदवडे, पुंद्रा, राजगोळी बु., सडेगुडवळे, तडशिनहाळ, तावरेवाडी, तुर्केवाडी, वाघोत्रे (ता. चंदगड), अरळगुंडी, चंदनकुड, चन्नेकुप्पी, चिंचेवाडी, दुग्गुनवाडी, हडलगे, हुनगिनहाळ, जांभुळवाडी, मुंगूरवाडी, मुत्नाळ, तनवडी, शिंदेवाडी, तुपूरवाडी, वैरागवाडी, यमेहट्टी (ता. गडहिंग्लज), कातळी, सांगशी, असळज, खोकुर्ले, शेनवडे, आणदूर, मार्गेवाडी, मांडुकली, मणदूर, वेतवडे, निवडे, तिसंगी, साखरी, मुटकेश्वर, असंडोली, कोदे बु., धुंदवडे, शेळोशी, बावेली (ता. गगनबावडा), मादळे, तामगाव, रजपूतवाडी (ता. करवीर), बांदिवडे, बादेवाडी, बोंगेवाडी, किसरूळ, मानवाड, पिसात्री, वारनूळ, पोंबरे, वाळवेकरवाडी, कसबा ठाणे ( पन्हाळा), पडसाळी, हसणे ( राधानगरी).

आचारसंहिता, जागा नसणे, ठेकेदार न मिळणे आदी कारणांमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेले नाही. जोडून अन्य काम ठेकेदाराला देऊन स्मशानशेडच्या बांधकामाच्या कामाला सुरुवात व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-एम. एस. घुले (उपमुख्य कार्यकारी अधिकारी)

Web Title: 'Smashan' was built on the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.