पडखंबेजवळ एस.टी.खाली चिरडून बालिका जागीच ठार
By Admin | Updated: May 8, 2014 15:12 IST2014-05-07T20:35:32+5:302014-05-08T15:12:06+5:30
संतप्त ग्रामस्थांकडून एस.टी.ची तोडफोड; चालकाला बेदम चोप

पडखंबेजवळ एस.टी.खाली चिरडून बालिका जागीच ठार
स तप्त ग्रामस्थांकडून एस.टी.ची तोडफोड; चालकाला बेदम चोपफोटो - मेलवर गारगोटी : गारगोटी-वेंगरूळ रस्त्यावरील पडखंबे फाट्यावर एस.टी.खाली चिरडून सहा वर्षांची बालिका जागीच ठार झाली. समृद्धी युवराज राऊत असे मृत बालिकेचे नाव आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी एस.टी.वर तुफान दगडफेक केली. यावेळी बस चालकासही ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. चालक बाळकृष्ण पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेतले.आज (बुधवार) सकाळी सव्वा आठच्या सुमारास ही बस गारगोटीहून पडखंबेकडे जात होती. यात बसमधून प्रियांका व समृद्धी राऊत या दोघी प्रवास करीत होत्या. वाळवा येथे पाहुण्यांच्या लग्नाहून त्या गावी परतत होत्या. पडखंबे फाट्यावर या दोघी एस.टी.तून उतरल्या. त्यांना घरी नेण्यासाठी त्यांचे चुलते साताप्पा राऊत येणार होते. याचवेळी शाडू वाहतूक करणार्या डंपरला साईट देत असताना समृद्धी राऊत ही एस.टी.च्या मागील चाकात सापडली. तिच्या डोक्यावरून एस.टी.चे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पडखंबे, न्हाव्याचीवाडी, शेळोली ग्रामस्थांना समजताच संतप्त झालेल्या नागरिकांनी एस. टी.वर तुफान दगडफेक केली. एस. टी.च्या काचा फोडल्या. घटनास्थळी पोलीस निरीक्षक बन्सी बारवकर, उपनिरीक्षक राजेश राठोड यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले. समृद्धीच्या मृत्यूचे वृत्त समजताच नातेवाइकांनी एकच टाहो फोडला. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत झाली असून, पोलिसांनी बसचालक बाळकृष्ण बापूसोा पाटील (वय ५०) यास ताब्यात घेतले आहे. प्रतिनिधी