शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेच्या फुलेवाडी फायर स्टेशनच्या नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला; १ ठार, ५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:02 IST

महापालिका कारभाराविरोधात संताप

कोल्हापूर : महापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक साहित्य वाहून नेणाऱ्या लिफ्टचा धक्का बसल्याने स्लॅब कोसळून एक मजूर ठार तर पाचजण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली.नवनाथ अण्णाप्पा कागलकर (वय ३५, रा. नवशा मारुतीजवळ, राजारामपुरी) असे मृताचे नाव आहे. तर अक्षय पिराजी लाड (३०, रा. शिवशक्ती कॉलनी, गंगाई लॉन, फुलेवाडी), दत्तात्रय सुभाष शेंबडे (३७, रा. सुधाकर जोशीनगर, संभाजीनगर), वैभव राजू चौगुले (२५, रा. बेलबाग मंगळवार पेठ) हे गंभीर जखमी झाले तर जया सुभाष शेंबडे (३७) व सुमन सदा वाघमारे (६०) या महिला किरकोळ जखमी झाल्या. जखमींना तत्काळ सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे स्लॅबचे शेवटच्या एकाच पोत्याचे काम राहिले असताना हा दुर्दैवी प्रकार घडला.

वाचा- दोन तासांत नेमली चौकशी समिती, आज अहवाल देणारमहापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे काम सोमवारपासून सुरू होते. मंगळवारी सकाळी प्रत्यक्षात स्लॅब टाकण्यास सुरुवात झाली. रात्री पावणेनऊच्या सुमारास शेवटच्या एका पोत्याचे काम शिल्लक असताना साहित्य वाहून नेणाऱ्या लिफ्टचा धक्का स्लॅबला लागल्याने स्लॅब कोसळला. त्यावेळी स्लॅबवर चारजण तर स्लॅबच्या खाली दोन कामगार होते. 

वाचा : थांबा थांबा.. ढिगाऱ्याखाली अजून एकजणस्लॅब कोसळताना त्याचा मोठा आवाज झाल्याने स्लॅबवरील चौघांनी उड्या मारल्या. त्यातील दोघेजण स्लॅबबरोबर खाली आले. त्यामुळे स्लॅबखाली चौघेजण दबले गेले. त्यात नवनाथ कागलकर यांचा जागीच मृत्यू झाला. स्लॅब कोसळताना परिसरात मोठा आवाज आल्याने आसपासच्या नागरिकांनी धाव घेत तत्काळ बचावकार्य सुरू केले. स्लॅबचे काम सुरू असल्याने फायर स्टेशनचे काही कर्मचारीही उपस्थित होते. त्यांनीही बचावकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले.

वाचा : ४९ लाखांचे काम एका क्षणात कोसळले, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

परिसर धावला मदतीलास्लॅब कोसळल्यानंतर परिसरात मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनीही आपली वाहने थांबवून बचावकार्यात मदत करण्यास सुरुवात केली.

अधिकाऱ्यांची धावाधावघटना घडल्यानंतर आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी बचावकार्य पूर्ण होईपर्यंत घटनास्थळी थांबून होते.

सौम्य लाठीमारदुर्घटना घडल्यानंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. वारंवार सूचना देऊनही गर्दी हटत नसल्याने पाेलिसांनी सौम्य लाठीमार करून गर्दी पांगविली.

९० मिनिटांचे बचावकार्यदुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांसह आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन जेसीबीद्वारे स्लॅबचा मलबा हटवण्याचे काम सुरू झाले. पहिल्या अर्ध्या तासात सर्व जखमींना बाहेर काढले. त्यानंतर एका तासात सर्व मलबा हटवण्यात यश आले. जवळपास ९० मिनिटे हे बचावकार्य सुरू होते.

महापालिका कारभाराविरोधात संतापदुर्घटनेनंतर जमलेल्या गर्दीतील अनेकांनी महापालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. अग्निशामक दलाच्या इमारतीचा स्लॅब इतक्या सहजपणे कोसळत असेल तर महापालिका नागरिकांना काय उपदेश करणार, असा संतप्त सवाल अनेकांनी उपस्थित केला तसेच या कामातही टक्केवारी होती काय, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.

जोडलेल्या सळया काढताना झाली कसरतस्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड अडथळे आले. जेसीबीच्या साहाय्याने मलबा हटवताना स्लॅबमधील बांधलेल्या सळया सहजासहजी काढता येत नव्हत्या. खाली कोणी कामगार असल्याची भीती, तर दुसरीकडे सळयांचा गुंता. त्यामुळे सिमेंट, खडी व वाळू यांचे मिश्रण असलेला ओला मलबा हटवताना बचाव पथकाची प्रचंड दमछाक झाली. हाताने सळया काढण्याशिवाय पर्याय नव्हता आणि हात घातला, तर सळया व तारा हाताला लागत होत्या. मात्र, तरीही बचाव पथकाने तब्बल ९० मिनिटे मागे न हटता बचावकार्य सुरू ठेवल्याने जखमींना बाहेर काढण्यात यश आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Fire Station Slab Collapse: One Dead, Five Injured

Web Summary : A slab collapse at Kolhapur's Phulewadi fire station killed one and injured five during construction. A lift malfunction caused the collapse as workers completed the final stages. Rescue operations faced challenges due to debris and tangled rods. Officials are investigating the incident.