शाहूवाडीत सोळा रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:25 IST2021-04-17T04:25:03+5:302021-04-17T04:25:03+5:30

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील गजापूर, करुंगळे प्रत्येकी एक, आंबा व पेरिड प्रत्येकी दोन, ओकोली -पाच, तर पन्हाळा तालुक्यातील ...

Sixteen patients positive in Shahuwadi | शाहूवाडीत सोळा रुग्ण पॉझिटिव्ह

शाहूवाडीत सोळा रुग्ण पॉझिटिव्ह

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील गजापूर, करुंगळे प्रत्येकी एक, आंबा व पेरिड प्रत्येकी दोन, ओकोली -पाच, तर पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे-एक व माले- चार अशा सोळा रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

शाहूवाडी तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन करंजोशी येथे शंभर बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी सध्या ३४ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. ‌मलकापूर ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर तालुक्यात ४०५४० नागरिकांनी लस घेतली आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट ६९ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे, तर आज दिवसभरात १२९६ नागरिकांनी लस घेतली. १ जानेवारीपासून आजअखेर ११४२ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यापैकी सरूड- दोन, शिरगाव, आंबर्डे, बांबवडे, येळाणे व चरण येथील प्रत्येकी एक अशा सातजणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

Web Title: Sixteen patients positive in Shahuwadi