शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

सोळा फुटबॉल संघांची नोंदणी आता रांगेविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:23 IST

भारतीय फुटबॉल महासंघ व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन देश व राज्यातील खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करते. याच धर्तीवर कोल्हापुरातील १६ संघांतील खेळाडू व संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार आज, बुधवारी संघांच्या सर्वेसर्वांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘के.एस.ए.’चा आॅनलाईन नोंदणीचा निर्णयआजपासून संघ व्यवस्थापकांसह म्होरक्यांना प्रशिक्षण

कोल्हापूर : भारतीय फुटबॉल महासंघ व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन देश व राज्यातील खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करते. याच धर्तीवर कोल्हापुरातील १६ संघांतील खेळाडू व संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षकांची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार आज, बुधवारी संघांच्या सर्वेसर्वांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती नेटीझन्सना आता एका क्लिकवर मिळत आहे. यात क्रीडाक्षेत्रही मागे नाही. क्रीडा संघटना देशपातळीवरील असो वा राज्य पातळीवरील असो; त्यातील खेळाडूंची नोंदणीही आॅनलाईन पद्धतीने होत आहे. काळाच्या ओघात संगणकीय प्रणाली कास धरत पंचाहत्तरी ओलांडलेली ‘कोल्हापूरची तिसरी फुटबॉल पंढरी’ म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या ‘कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन’नेही आपल्या क्षेत्रातील खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदापासून खेळाडूंना नोंदणीकरिता शाहू स्टेडियमवरील ‘के.एस.ए.’ कार्यालयाच्या बाहेर रांगा लावाव्या लागणार नाहीत.

यात खेळाडूंची संपूर्ण माहिती आॅनलाईन अर्जाद्वारे भरून घेतली जाणार आहे. यात कोल्हापुरातील १६ संघांचे २० खेळाडू आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, संघ व्यवस्थापक, सहायक संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक अशा ४०० जणांची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने प्रथमच करून घेतली जाणार आहे. याकरिता आज, बुधवारी १६ संघांतील संघ व्यवस्थापन करणाऱ्या प्रतिनिधींना प्रशिक्षणाकरिता ‘के.एस.ए.’ने पाचारण केले आहे.या खेळाडूंची नोंदणी आॅफलाईनचजिल्ह्याबाहेरील व नवीन खेळाडूंची नोंदणी संघांना कार्यालयातच येऊन करावी लागणार आहे; कारण मागील वर्षातील नोंदणी केलेल्या खेळाडूंनाच यंदा आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल, अशी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. पुढील वर्षापासून सर्वच खेळाडूंची नोंदणी आॅनलाईन पद्धतीने होणार आहे.या संघांची नोंदणी होणारशिवाजी तरुण मंडळ, प्रॅक्टिस क्लब (अ), पाटाकडील तालीम मंडळ (अ) व (ब), दिलबहार तालीम मंडळ (अ), बालगोपाल तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ (अ) व (ब), फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, बी. जी. एम. स्पोर्टस, संयुक्त जुना बुधवार तालीम, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, ऋणमुक्तेश्वर तालीम, मंगळवार पेठ फुटबॉल क्लब, कोल्हापूर पोलीस संघ या १६ संघांचा समावेश आहे.

कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी आॅनलाईन नोंदणी ही महत्त्वाची बाब आहे. नव्या हंगामात या सोबतच खेळाडूंना स्वयंशिस्त व आचारसंहितेचे धडेही द्यावेत.- सतीश सूर्यवंशी, अध्यक्ष, खंडोबा तालीम मंडळ फुटबॉल संघ 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर