शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

विधानसभेसाठी २१ मतदान केंद्रे वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 13:15 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात  २१ पोट मतदान केंद्रांची (सहाय्यकारी) भर पडणार आहे. सर्वाधिक प्रत्येकी आठ केंद्रे ही शिरोळ व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर एकूण केंद्रांची संख्या ३३४२ होणार आहे.

ठळक मुद्देविधानसभेसाठी २१ मतदान केंद्रे वाढणारपोट केंद्रांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर

प्रवीण देसाईकोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात  २१ पोट मतदान केंद्रांची (सहाय्यकारी) भर पडणार आहे. सर्वाधिक प्रत्येकी आठ केंद्रे ही शिरोळ व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील आहे. त्याबाबतचा प्रस्ताव नुकताच जिल्हा निवडणूक विभागाने भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर एकूण केंद्रांची संख्या ३३४२ होणार आहे.महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी जिल्हा निवडणूक विभागाकडून सुरू आहे. टप्प्याटप्प्याने काम सुरू असून भारत निवडणूक आयोगाकडून याचा आढावा घेतला जात आहे. जिल्ह्यात  एकूण ३३२१ मतदान केंद्रे आहेत. एका मतदान केंद्रावर १५०० पर्यंत मतदार अपेक्षित आहेत. परंतु अनेक मतदान केंद्रांवर १५०० हून अधिक मतदार वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने १५०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या २१ केंद्रांवर पोट केंद्रे (सहाय्यकारी) करण्याचा निर्णय घेतला आहे.

या केंद्रांचा प्रस्ताव तयार करून तो भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंजुरीनंतर जिल्ह्यात एकूण ३३४२ केंद्रे होणार आहेत. सर्वाधिक केंद्रे ही इचलकरंजी व शिरोळ विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी आठ होणार असून कागल व कोल्हापूर उत्तरमध्ये प्रत्येकी दोन, कोल्हापूर दक्षिणमध्ये एका केंद्राचा समावेश आहे.

मतदान केंद्रांच्या नावात अन ठिकाणात होणार बदलमहापुरामुळे मतदान केंद्रे बाधित होऊन ती पडणे, मोडकळीस येण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही केंद्रे ही दुसऱ्या मजल्यावर असून, ती पहिल्या मजल्यावर घेण्याबाबत विचार सुरू होता.

या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी अशा नुकसान झालेल्या मतदान केंद्राचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने ठिकाण बदलण्याचे ६१ प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचबरोबर मतदान केंद्रांच्या नावात बदल करावयाच्या १४ केंद्रांचा प्रस्तावही पाठविला आहे.विधानसभा मतदार संघ मतदान केंद्रे (सध्या)  सहाय्यकारी केंद्रे       (प्रस्तावित)     एकूण मतदान केंद्रेचंदगड                                             ३७६      --                    ३७६राधानगरी                                        ४२३      --                    ४२३कागल                                             ३५१      ०२                   ३५३कोल्हापूर दक्षिण                              ३२२      ०१                  ३२३करवीर                                              ३५१       --                  ३५१कोल्हापूर उत्तर                                ३०९       ०२                 ३११शाहूवाडी                                            ३३२      --                  ३३२हातकणंगले                                       ३३०       --                 ३३०इचलकरंजी                                       २४६       ०८                 २५४शिरोळ                                              २८१       ०८                 २८९एकूण                                             ३३२१        २१               ३३४२ 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर