शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सहा तास शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:51 AM

‘लोकमत’च्या महामॅरेथॉनमध्ये स्पर्धेंकांची गैरसोय होऊ नये, स्पर्धा शांततेत व उत्साही वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस दलाने खूप परिश्रम घेतले. स्पर्धेच्या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन, चौका-चौकांत पोलीस असा सहा तासांचा शिस्तबद्ध बंदोबस्त पार पाडला. प्रत्येक स्पर्धकाला आपण रस्त्यावर सुरक्षित असल्याची जाणीव झाली.‘लोकमत’ महामॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, ...

‘लोकमत’च्या महामॅरेथॉनमध्ये स्पर्धेंकांची गैरसोय होऊ नये, स्पर्धा शांततेत व उत्साही वातावरणात पार पडावी, यासाठी पोलीस दलाने खूप परिश्रम घेतले. स्पर्धेच्या मार्गावरील वाहतुकीचे नियोजन, चौका-चौकांत पोलीस असा सहा तासांचा शिस्तबद्ध बंदोबस्त पार पाडला. प्रत्येक स्पर्धकाला आपण रस्त्यावर सुरक्षित असल्याची जाणीव झाली.‘लोकमत’ महामॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शिस्तबद्ध पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश माने, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ, शाहुपूरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, राजारामपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम, राखीव पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे, पोलीस क्रीडा विभागप्रमुख प्रकाश पाटील यांनी मेहनत घेतली. दोन दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी संपूर्ण मार्गाची पाहणी करून बंदोबस्ताचे नियोजन केले. त्यानुसार रविवारी पहाटे चारपासून पोलीस रस्त्यावर उतरले. सुमारे सहा तास बंदोबस्त पार पाडला.मार्गावर स्पर्धकाला कोणताही त्रास होवू नये, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, अशा दोन्ही बाजूंनी खबरदारी पोलिसांनी घेतली. शंभरपेक्षा जास्त बॅरिकेट लावून एकमार्गी वाहतुकीचे नियोजन केल्याने वाहनधारकांना कुठल्याही प्रकारे त्रास झाला नाही. सर्व मार्गावर शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. ३ ते २१ कि. मी. मार्गावर धावणाºया प्रत्येक स्पर्धकाला आपण सुरक्षित असलेची जाणीव झाली.पोलीस मुख्यालय मैदान, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, सेंट झेवियर्स हायस्कूल, मुख्य पोस्ट कार्यालय, पितळी गणपती, धैर्यप्रसाद चौक, सैनिक दरबार हॉल, लाईन बझार चौक, सदर बझार चौक, ताराराणी पुतळा, रेल्वे गेट, हायवे कॅन्टीन, शाहू टोल नाका, शिवाजी विद्यापीठ आदी मुख ठिकाणी बॅरिकेट लावून एकमार्गी वाहतूक करण्यात आली होती. प्रत्येक चौकात तीन-चार वाहतूक पोलीस असे सुमारे शंभर पोलीस व चार अधिकारी बंदोबस्तास होते.यांचेही पाठबळ महत्त्वाचेलोकमत महामॅरेथॉनचे टायटल स्पॉन्सर ‘राजुरी स्टील’ असून वारणा दूध, एच. एम. डी. ग्लोबल गु्रप, मनी ट्रेड क्वाईन गु्रप, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, डी. वाय. पी. हॉस्पिटॅलिटी प्रा.लि., अ‍ॅस्टर आधार , साई सर्व्हिस, फु्रटेक्स, केट्री, संदीप युनिव्हर्सिटी, रिलायन्स स्मार्ट, रेडिओ सिटी, रिलॅक्स-झेल, नाईस, ब्रँड इट एलईडी स्क्रीन, मर्क इलेक्ट्रोबीन सीप, ‘यु टू कॅन रन ’, मोहन ट्रॅव्हल्स, गोल्डस् जीम हे प्रायोजक आहेत.पार्किंगची व्यवस्थास्पर्धेसाठी येणाºया वाहनधारकांसाठी पार्किंगची व्यवस्था पोलीस उद्यानासमोरील पटांगणात केली होती. प्रवेशद्वारापासून आतमध्ये वाहन पार्किंग करुन घेण्यापर्यंतची मदत वाहतूक पोलिसांनी केली. एका रांगेत वाहने पार्किंग करुन घेण्यामध्ये त्याचे मोलाचे सहकार्य लाभले.