शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातून गोव्याकडे जाणाऱ्या १२ बसेस राधानगरीत अडकल्या, दीडशे प्रवासी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:39 IST

पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत.

कोल्हापूर - पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशे गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढत आहे. दरम्यान राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर बस पाण्यात अडकली असून त्यातील तीस प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुणे येथून सुमारे दिडशे प्रवाशांना घेऊन  बारा बसेस गोव्यात येत होत्या. काल (५ ऑगस्ट) सोमवार मध्यरात्री अडीच वाजता या बसेस कोल्हापूर येथे दाखल झाल्या. कोल्हापूरात पोहोचल्यानंतर पुढील महामार्गावर पुराचे पाणी आल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी कोल्हापूरहुन गोव्यात येण्यासाठी मॅपचा आधार घेत गारगोटी, देवगड हा अंतर्गत रस्ता धरला. या रस्यावर पूर्वीपासून पाणी आले होते. याची माहिती बस चालकांना नसल्याने त्यांनी बसेस तशाच पुढे नेल्या. राधानगरी येथे पोहोचताच त्यांना येथील सर्व गाव पाण्याखाली गेल्याचे समजले. सर्व बसेस मागे नेण्याचा प्रयत्न केला असता मागील भाग सुद्धा पाण्यात बुडल्याचे त्यांना आढळून आले.

दरम्यान बसच्या चालकाने निष्काळजी पणा दाखवत बस तशीच पुढे नेल्यामूळे सदर बस राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर पाण्यात अडकली. धोक्याचा इशारा दिलेला असतांना बस पूढे नेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घेतल्यामुळे संतापलेल्या लोकांनी बस चालकाला बेदम चोप दिल्याचे समजते. 

पोलिटिकल सायन्सच्या गोव्यातील शिक्षिका संस्कृती आईर यांनी सकाळी दहाच्या दरम्यान आपात्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

जवळच्या गावातील सर्व लोकांना बचाव पथकाच्या मदतीने दुसऱ्या जागी हलवले आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कोणीच उपस्थित नाही.पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आल्या नंतर इतरांना मदत केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिल्याचे आईर यानी सांगितले. अडकून पडलेल्या प्रवाशांमध्ये वृद्ध,महिला आणि मुलांचा सुद्धा समावेश आहे. त्यांना कालपासून काहीच खायला मिळालेले नाही. पाण्याचा स्तर वाढत चालल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर