सिंगलसाठी सिंगलसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:07+5:302021-06-16T04:34:07+5:30

गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया खन्ना यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ...

For singles for singles | सिंगलसाठी सिंगलसाठी

सिंगलसाठी सिंगलसाठी

गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया खन्ना यांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात येणारा ‘धन्वंतरी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या केंद्रातंर्गत येणाऱ्या ११ गावांमध्ये खन्ना यांनी रुग्णांसाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार दिला आहे.

-----------------------

२) नांगनूरच्या आपद्ग्रस्तांना मदत

गडहिंग्लज : मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नांगनूर येथील कांबळे कुटुंबीयांच्या नातेवाईकांना नूलच्या स्वारंभ फाउंडेशनतर्फे ११,५०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी विश्वस्त सुमित चौगुले, स्वप्निल नाईक, योगेश चव्हाण, उपसरपंच विकास मोकाशी आदी उपस्थित होते.

-------------------------

३) ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या

गडहिंग्लज : कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ग्रा. पं. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघ (आयटक) यांच्यातर्फे जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

शिष्टमंडळात, संघाचे अध्यक्ष नामदेव गावडे, उपाध्यक्ष रवी कांबळे, सम्राट मोरे, रोहित भंडारी, दीपक कांबळे, दत्तात्रय मोरे आदींचा समावेश होता.

-------------------------

४) गडहिंग्लजमध्ये जाधव यांचा सत्कार

गडहिंग्लज : येथील जि. प. बांधकाम विभागाचे उपअभियंता एल. एस. जाधव यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पंचायत समितीतर्फे सभापती रूपाली कांबळे यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी उपसभापती ईराप्पा हसुरी, गटविकास अधिकारी शरद मगर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: For singles for singles