सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST2020-12-22T04:23:53+5:302020-12-22T04:23:53+5:30
महागाव : उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त नेताजी कला, क्रीडा मंडळातर्फे आयोजित शिबिरात ...

सिंगलसाठी
महागाव : उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त नेताजी कला, क्रीडा मंडळातर्फे आयोजित शिबिरात ८३ पिशव्या रक्तसंकलन झाले. यावेळी वीरपिता गणपती चौगुले, वीरमाता वत्सला चौगुले, वीरपत्नी यशोदा चौगुले, सरपंच ज्योत्स्ना पताडे, श्रीशैल पाटील, अनिल गिरी, पोलीस पाटील शोभा सावंत, जनार्दन पोवार, अजिंक्य चव्हाण, शिवाजी माने, रजनीकांत चौगुले, विश्वजित महागावकर, रामचंद्र वळतकर, आदी उपस्थित होते.
------------------------------------------
२) अडकूर पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कृष्णा पाटील
कोवाड : अडकूर (ता. चंदगड) येथील आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कृष्णा पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी सुलोचना माटले यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी कल्लाप्पा कोळी होते. यावेळी अशोक जाधव, अशोक परमशेट्टी, महादेव शिवणगेकर, रामचंद्र बागडी, हणमंत देसाई, सुनील शिंदे, गोपाळ पाटील, शामराव अडकूरकर, महादेव नाईक, तुकाराम रोडे, चंद्रभागा कुपेकर उपस्थित होते. व्यवस्थापक तानाजी पोवार यांनी आभार मानले.