सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:16+5:302021-02-05T06:59:16+5:30
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू प्राजक्ता परशराम शिंदे हिने पुणे येथे झालेल्या अमॅच्युअर अॅथलेटिक्स स्पर्धेत ५००० मीटर धावणेत ...

सिंगलसाठी
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू प्राजक्ता परशराम शिंदे हिने पुणे येथे झालेल्या अमॅच्युअर अॅथलेटिक्स स्पर्धेत ५००० मीटर धावणेत द्वितीय क्रमांक पटकाविला. तिची आसाम येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. तिला क्रीडाशिक्षक प्रा. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
------------------------
२) शिवराज महाविद्यालयात मधुमक्षिका पालन प्रयोग यशस्वी
गडहिंग्लज : शेतीमध्ये परागीभवनाचे सुमारे ९० टक्के काम मधमाशा करतात. मधमाशा नाहीशा झाल्या, तर चार वर्षांत मानवी जीवन संपुष्टात येईल, असे शास्त्रांचे मत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातर्फे मधमाशी पालनाचा प्रयोग गेली वर्षभर यशस्वीपणे राबविण्यात आला.
याकामी संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव प्रा. अनिल कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, विभागप्रमुख प्रा. किशोर अदाटे यांचे प्रोत्साहन मिळाले.