सिंगलसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:32+5:302021-01-21T04:23:32+5:30
गडहिंग्लज : येथील ई.बी. गडकरी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या बी.एच.एम.एस. चतुर्थ वर्षाच्या ४१ विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ...

सिंगलसाठी
गडहिंग्लज : येथील ई.बी. गडकरी होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या बी.एच.एम.एस. चतुर्थ वर्षाच्या ४१ विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.पी. डिसोझा होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
चिन्मय तिकोडे, उल्पाराणी पाटील, शफक दीडबाग, पूजा सिताप या विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सत्कार झाला. यावेळी श्रीधर रूपनर, डॉ. श्रीधर चौगुले, विशाल चव्हाण, साक्षी पाटील, उत्तम कांबळे आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
------------------------
२) गतिरोधक करण्याची मागणी
गडहिंग्लज : शहरातील डॉक्टर कॉलनीतील चौगुले व पाटोळे बालरुग्णालय परिसरातील रस्त्यावर गतिरोधक करावेत, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी यांनी बांधकाम अभियंत्यांकडे निवेदनातून केली आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तसेच नजीकच बसस्थानक असून, शाळकरी व महाविद्यालयीन मुले-मुलींची मोठी रहदारी या मार्गावर असते. मात्र, काही उत्साही तरुण बेदरकारपणे वाहने या मार्गावरून नेतात. त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रस्त्यावर गतिरोधक करावेत.