कोवाड : कोवाड (ता. चंदगड) येथील साहित्यिक पांडुरंग कुंभार प्रतिष्ठानतर्फे स्वामीकार रणजित देसाई यांचे लेखनिक पांडुरंग कुंभार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘वेगळ्या वाटा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार’साठी कथासंग्रह मागविण्यात येत आहेत. प्रथम पुरस्कारासाठी ५००० व द्वितीय पुरस्कारासाठी २००० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
कथासंग्रह पाठविणाऱ्या लेखक व प्रकाशक यांनी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती १५ फेब्रुवारीपूर्वी प्रतिष्ठानकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
--- २) ‘शिवराज’मध्ये व्याख्यान
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात ‘मूल्य, तंत्रशिक्षण व पर्यावरण शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर शिवाजी नेर्ली यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. श्रीदेवी गाडवी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी तानाजी चौगुले आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
--- ३) लॉटरी विजेत्याला आवाहन
गडहिंग्लज : शहरातील भाग्यलक्ष्मी लॉटरी सेंटरमधून ‘महाराष्ट्र गौरव’ हे लॉटरी तिकीट घेतलेल्यांपैकी सोडत क्रमांक ३८ सिरीज नंबर ३१-१८४७ या लॉटरी तिकिटाला ३५ लाखांचे बक्षिस लागले आहे. संबंधिताने सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय होरकेरी यांनी केले आहे. या सेंटरमध्ये ११ महिन्यांत दुसऱ्यांदा ३५ लाखांचे बक्षीस लागले आहे.
---४) गडहिंग्लज हायस्कूलमध्ये संयुक्त कार्यक्रम
गडहिंग्लज : शहरातील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहनिमित्त ज्ञान शिदोरी ग्रंथ प्रदर्शन व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप असा संयुक्त कार्यक्रम मुख्याध्यापक एस. एन. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सुहास शिंदे, जयश्री पाटील, व्ही. आर. पालेकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
--- ५) गडहिंग्लजमध्ये मान्यवरांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील जनता सहकारी गृहतारण संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी संस्थेच्या आजरा शाखा संचालकपदी निवड झाल्याबद्दल मारुती मोरे यांचा रामभाऊ शिवणे यांच्या हस्ते, अशोक बाचूळकर यांचा गंगामाई वाचन मंदिर अध्यक्षपदी निवडीबद्दल प्रकाश तेलवेकर यांच्या हस्ते तर रवींद्र शिऊडकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप माने यांच्या हस्ते सत्कार झाला.
यावेळी नंदकुमार शेळके, बंडोपंत पेडणेकर, विश्वास देवाळे, के. बी. पोवार, बाळासाहेब बडदारे, बाळासाहेब सावंत, अशोक मेंडुले, प्रकाश पोवार, बाळकृष्ण चौगुले, हरिभाऊ पन्हाळकर, सुरेश डोंगरे, दिनेश पाटणे आदी उपस्थित होते.
------- ६) साधनामध्ये‘अटल लॅब’चे उद्घाटन
गडहिंग्लज : येथील साधना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ‘अटल लॅब’चे उद्घाटन जिल्हा बँक संचालक प्रताप माने यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांमध्ये चौकस बुद्धिमत्ता, निर्मिती कल्पकता निर्माण होण्यासाठी या लॅबचा उपयोग होईल. यावेळी संस्था सचिव जे. बी. बारदेस्कर, संचालक अरविंद बारदेस्कर, राजेंद्र तारळे, प्राचार्य जी. एस. शिंदे, डॉ. प्रवीण चौगुले, प्राचार्य डी. आर. माने, रफिक पटेल, टी. बी. चव्हाण, अश्विनी देसाई, रामगोंडा पाटील आदी उपस्थित होते.