शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बंदुका बनविण्याच्या कारखान्यावर छापे, माणगाव येथे एक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:38 IST

फेब्रिकेशनच्या नावाखाली अवैधरित्या छुप्या पध्दतीने बंदुका बनविल्या जात असलेल्या कारखान्यावर सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापे टाकून बंदुकांसह काडतुसे जप्त केली.

ठळक मुद्देबंदुका बनविण्याच्या कारखान्यावर छापेमाणगाव येथे एक ताब्यात : चौघांची चौकशी सुरू

सिंधुदुर्ग : फेब्रिकेशनच्या नावाखाली अवैधरित्या छुप्या पध्दतीने बंदुका बनविल्या जात असलेल्या कारखान्यावर सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापे टाकून बंदुकांसह काडतुसे जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी कुडाळ तालुक्यातील माणगाव - कुंभारवाडी येथे करण्यात आली असून, या प्रकरणी परेश कृष्णा धुरी (३५) याला अटक करण्यात आली आहे. तर अन्य चौघा कामगारांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.माणगाव-कुंभारवाडी येथे परेश धुरी याने तीन वर्षांपूर्वी फेब्रिकेशनचे दुकान घातले होते. मात्र, या दुकानात फेब्रिकेशनच्या नावाखाली तो बंदुका बनवत असे. या बंदुकांमध्ये काडतुसाच्या बंदुकांचा समावेश होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला लागली. प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी आपल्या पथकासह शुुक्रवारी दुपारपासूनच माणगाव-कुंभारवाडी येथील फेब्रिकेशनमध्ये सर्च आॅपरेशन सुरू केले होते.यामध्ये त्यांना चार बंदुका आढळून आल्या आहेत. यात एक काडतुसाची, तर तीन ठासणीच्या बंदुकांचा समावेश आहे. बंदुका तयार करण्यासाठी लागणारे सामानही पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत पोलिसांना गावठी कट्टाही सापडला आहे. मात्र, याला उशिरापर्यंत दुजोरा दिला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पोलिसांना बंदुका बनवण्याचा कारखाना आढळून आला आहे. त्यामुळे पोलिसही चांगलेच सतर्क झाले आहेत.पोलिसांनी या प्रकरणी परेश धुरी याला अटक केली असून, त्याची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. त्याच्या दुकानात असलेल्या कामगारांकडूनही पोलीस माहिती घेत असून, त्यांना उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी दुकान तसेच अन्य ठिकाणांची झाडाझडती सुरूच ठेवली असून, तयार केलेल्या बंदुका कोणाला विकण्यात आल्या तसेच आहे त्या बंदुका कोणासाठी तयार करण्यात येत होत्या, याची चौकशी करीत होते. पण आरोपीने उशिरापर्यंत कोणतीही माहिती दिली नव्हती.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच कारवाईसिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच माणगाव येथे बंदुका तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी छापे टाकून उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे अभिनंदन होत असले तरी जिल्ह्यात मात्र एकच खळबळ उडाली आहे. माणगावमधून तयार केलेल्या बंदुका कुठे विक्री केल्या जात होत्या याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. या पथकाचे पोलीस अधीक्षकांनीही कौतुक केले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिस