शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगडावर साधेपणाने; पण उत्साहात शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

पन्हाळा : भिरभिरणारे भगवे ध्वज, ओसंडून वाहणारा उत्साह, मनामनांत शिवप्रेम, अशा जल्लोषी वातावरणात शिवजयंती उत्सव ...

पन्हाळा : भिरभिरणारे भगवे ध्वज, ओसंडून वाहणारा उत्साह, मनामनांत शिवप्रेम, अशा जल्लोषी वातावरणात शिवजयंती उत्सव पन्हाळगडावर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. ‘ शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर आणि पन्हाळा शहर परिसरात वातावरण शिवमय झाले होते.

पन्हाळगडावर शिवज्योत नेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त पन्हाळ्यावर दाखल झाले. शिवमंदिरातून १,१५० शिवज्योतींचे प्रज्वलन करण्यात आल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक हनीफ नगारजी यांनी दिली. सकाळी १० वाजता शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. यात महिलांचा मोठा सहभाग होता.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी शिवजयंतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. रात्री १.३० वाजेच्या सुमारास पन्हाळगडावर शिवज्योती नेण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे कोणीही हजर नव्हते. दरम्यान, शिवज्योती नेण्यास येणाऱ्यांचे वाहनतळ बुधवार पेठ येथे केले होते. पन्हाळा पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच पालिका कर्मचाऱ्यांकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. पन्हाळगडावरील व्यावसायिकांनी छोटे-मोठे स्टॉल उभारणी केल्यानंतर शहरात यात्रेचे चित्र पाहावयास मिळत होते. संयुक्त शिवजयंती उत्सव समिती पन्हाळा यांच्यामार्फत स्मरणशक्ती स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्लो सायकलिंग स्पर्धा व रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा रूपाली धडेल, उपनगराध्यक्ष शरयू लाड, नगरसेवक, नगरसेविका, तसेच संयुक्त शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

फोटो------- १९ पन्हाळा शिवजयंतीनिमित्त पाळणागीत गाताना महिला.