शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईच चालवतोय चंदगड भूमिअभिलेखचा कारभार

By admin | Updated: March 9, 2015 23:57 IST

अतिरिक्त कार्यभार पन्हाळा उपअधीक्षकांकडे : आठ महिन्यांंपासून अधिकाऱ्यांची प्रतीक्षा; तब्बल १३ पदे रिक्त

नंदकुमार ढेरे - चंदगड -येथील भूमिअभिलेख कार्यालयात आठ महिन्यांपासून उपअधीक्षक, मंजूर १६ पदांपैकी १३ पदे रिक्त आहेत. या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षकांकडे. त्यामुळे या कार्यालयाला कोणी वालीच नसल्याने शिपाईच कार्यालय चालवीत आहे. कार्यालयाकडे आपल्या प्रलंबित कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना या कार्यालयाकडे केवळ वायफळ फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयाकडे एकूण १६ पदे मंजूर आहेत. याठिकाणी उपअधीक्षक असलेले एन. एस. दोशी हे १६ आॅगस्ट २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून आठ महिने हे पद रिक्त आहे. निमतानदार १, भूकरमापक ३, प्रतिलिपिक १, नगर भूकरमापक लिपिक १, दुरुस्ती लिपिक १, आवक-जावक १, छाननी लिपिक १, अभिलेखापाल १, दफ्तरबंद १, शिपाई ३ व मुख्यालय सहायक १ अशी १६ पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या या कार्यालयाकडे मुख्यालय सहायक १, शिपाई १, लिपिक १, भूकरमापक १ असे ४ कर्मचारी कामावर आहेत. त्यापैकी शिरोळ तालुक्यातून चार महिन्यांपूर्वी बदलून आलेले भूकरमापक हे दोन महिन्यांपासून दीर्घ रजेवर आहेत. मुख्यालय सहायक असलेले राणे यांना कार्यालयीन मिटिंग व इतर कामांसाठी गडहिंग्लज, कोल्हापूर येथे वारंवार जावे लागत असल्याने कार्यालय चालविण्याची वेळ शिपायावर येत आहे.सध्या या कार्यालयाकडे तालुक्यातील जमीन मोजणीची ९० प्रकरणे, वारसा नोंदी, कमी-जास्त पत्रक, कब्जा, कोर्ट कमिशन, आदी कामे प्रलंबित आहेत. याशिवाय जुने ७/१२, ८ अ, वारसा नोंद, प्रॉपर्टी कार्ड यांची माहिती विचारण्यास येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या प्रचंड आहे. या सर्वांना लिपिक व शिपाई यांना तोंड द्यावे लागत आहे.या कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे डुक्करवाडी येथील रवींद्र देशपांडे, हेमंत देशपांडे या शेतकऱ्यांची डिसेंबर २०१३ मधील मोजणी अद्याप खोळंबली आहे. शेती मोकळी असल्याने शेतकरी लवकर मोजणी करून घेण्यासाठी या कार्यालयाकडे दररोज फेऱ्या मारत आहेत. मात्र, त्यांना नेहमीचीच उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार पन्हाळ््याच्या उपअधीक्षक पल्लवी शिरकोळे यांच्याकडे आहे. १५ दिवसांतून एकदाच शिरकोळी यांची या कार्यालयाला भेट होते. पन्हाळ््यावरून चंदगडला येण्यासाठी दोन वाजतात. दोन वाजता कार्यालयात आल्यानंतर फक्त सह्या करून पुन्हा लगेच त्या माघारी जातात. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यभार शेतकऱ्यांच्या दृष्टीने असून नसल्यासारखा आहे. शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांबाबत वेळीच निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेशेतकऱ्यांसह नागरिकांच्या महत्त्वाच्या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयात कर्मचारीच नाहीत ही बाब खेदजनक आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. शिवाय जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षकांनी चंदगडचा तात्पुरता कार्यभार गडहिंग्लज येथील अधिकाऱ्यांऐवजी पन्हाळा उपअधीक्षकांकडे देण्यामागचे गौडबंगाल काय आहे, हे मात्र समजले नाही.