जयसिंगपूर : येथील अजिंक्यतारा हाउसिंग सोसायटी येथून चांदीच्या देवाच्या मूर्ती चोरणारी वृद्धा सीसीटीव्ही फुटेजमुळे सापडली. प्रभा दत्तात्रय महाडिक (वय ६८, रा. कोरेगावकर कॉलनी, पुलाची शिरोली, ता.करवीर) असे तिचे नाव असून, तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी तिच्याकडून मुद्देमाल जप्त केला.मंगळवारी (दि. २३) फिर्यादी अनघा अनिल कुलकर्णी यांनी घरातील चांदीच्या वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती स्वच्छ करून बाहेर ठेवल्या होत्या. त्या चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने तपासयंत्रणा राबविली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर फुटेजमध्ये संशयित महिला आढळून आली. जयसिंगपूर बसस्थानकावर या चांदीच्या वस्तू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर चांदीच्या मूर्ती मिळून आल्या. पोलिसांनी तिला अटक केली.
Web Summary : An elderly woman, Prabha Mahadik, was arrested in Jaisingpur for stealing silver idols. CCTV footage helped police identify and capture her at the bus station while attempting to sell the stolen goods. The stolen items were recovered.
Web Summary : जयसिंगपुर में प्रभा महाडिक नामक एक वृद्ध महिला को चांदी की मूर्तियाँ चुराने के आरोप में गिरफ्तार किया गया। सीसीटीवी फुटेज की मदद से पुलिस ने उसे बस स्टेशन पर चोरी का सामान बेचने की कोशिश करते हुए पकड़ा। चोरी की वस्तुएं बरामद की गईं।