शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या गाड्यांतून फिरण्याची क्रेझ, 'फास्टॅग'चा फायदा 'एमएच-०९' लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:08 IST

खासगी प्रवासी वाहतूकदारांनाही लाभ देण्याची मागणी 

कोल्हापूर : महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्याच्या उद्देशाने येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. तीन हजार रुपये किमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा २०० फेऱ्यांसाठी लागू असेल. मात्र, हा निर्णय कोल्हापूरकारंना (एमच-०९) चांगलाच फायद्याचा ठरण्याची चिन्हे आहेत. कारण येथील अनेक जणांना सतत आपल्या गाड्यातून राज्यात तसेच देशभर पर्यटनाची क्रेझ आहे. तसेच येथे उद्योजक, तसेच व्यावसायिकांचाही मोठा वर्ग असल्यांने त्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. मात्र जी खासगी वाहने केवळ सुट्टी आणि सणाच्या कालावधीत परजिल्हा, परराज्यांत जातात. त्यांना मात्र या सवलत योजनेचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.राष्ट्रीय महामार्गावर व्यक्तिगत वापराच्या वाहनांना हा पास वापरता येणार असल्याचे धोरण आहे. साातत्यांने बाहेर पर्यटनासाठी वा इतर कारणासाठी फिरणाऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे.मात्र, खासगी वाहने दिवाळी, मे महिन्याची सुटी, नाताळ, गणपती या कालावधीतच परजिल्हा, परराज्य आणि देशात काही धार्मिक आणि पर्यटनासाठी बाहेर पडतात. हा पास काढल्यास वर्षभरात २०० वेळा प्रवास करणे शक्य होणार नसल्याचे खासगी वाहनमालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पास काढण्यासाठीची लिंक लवकरच राजमार्ग यात्रा ॲप आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकृत संकेत स्थळांवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

२०० वेळा वर्षभरात प्रवास करणे ज्या कुटुंबान बाहेर प्रवास करणे शक्य नाही त्या खासगी वाहनचालकांना मात्र ही योजना जादा फायद्याची ठरणार नाही.

खासगी वाहनांसह ओला, उबेरसह काळी पिवळी टॅक्सीचा या योजनेत समावेश करावा. कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा महत्त्वाचा घटक आहे. रोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या टॅक्सी आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होऊ शकेल. - सुभाष जाधव, अध्यक्ष जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन

आम्ही फक्त गणपती सण आणि सुटीसाठी कालावधीसाठी कोकणात जातो. त्यामुळे या निर्णयाचा लाभ होईल, असे वाटत नाही. गणपतीच्या काळात तर कोकणवासीयांना टोल माफी दिली जाते. तीन हजारांत वर्षभराच्या फास्टँगचा फायदा होणार नाही. - सूरज मयेकर, निवती, कोकण

पाल्यांना भेटी, दवाखाना, शिक्षणासाठी पुणे आणि मुंबईपर्यंत प्रवास होतो. मात्र, हा महिन्यातून पाच वेळा जरी हा प्रवास झाला तरी वर्षातून ६० वेळा प्रवास होतो. सातत्याने प्रवास झाल्यास हा पास काही जणांना उपयोगी पडू शकेल. - राजन चव्हाण, इचलकरंजी

ट्रान्स्पोर्टच्या वाहनांचा देशभर प्रवास सुरू असतो. त्यात काही वाहनचालक रोज राष्ट्रीय महामार्गावर असतात. सेव्हन सीटर क्षमता असलेल्या ट्रान्स्पोर्टच्या वाहनांना हा पास देणे गरजेचे आहे. कारण सर्वांधिक वाहतूक पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेट असलेली वाहने करतात. त्यांचाही नव्या धोरणात विचार करावा. - गणेश पाटील, वाहतूक व्यावसायिक