महत्त्वाचे क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:29+5:302021-07-08T04:17:29+5:30

शहापूर : येथील स्टारनगर, पंचगंगा साखर कारखान्याजवळ व कोरोची (ता. हातकणंगले) परिसरामध्ये अशा तीन ठिकाणी मटका घेणाऱ्या चौघांवर शहापूर ...

Significant Crime | महत्त्वाचे क्राईम

महत्त्वाचे क्राईम

शहापूर : येथील स्टारनगर, पंचगंगा साखर कारखान्याजवळ व कोरोची (ता. हातकणंगले) परिसरामध्ये अशा तीन ठिकाणी मटका घेणाऱ्या चौघांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम व साहित्य असा सुमारे पाच हजार ५१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.६) रात्री करण्यात आली. शंकर शामराव खांडेकर (वय ३६, रा. तारदाळ, ता.हातकणंगले), अभिजीत अरुण ढवळे (२५,रा. जवाहरनगर), सहदेव मच्छिंद्र चौगुले (५०, रा. कोरोची) व असिफ मुजावर (रा. रुकडी, ता.हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीस पळवले

शहापूर : कोरोची (ता. हातकणंगले) येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिली आहे. हा प्रकार २ जुलै ते ७ जुलैदरम्यान घडला.

मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एक ताब्यात

इचलकरंजी : शहरातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी एकास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. योगेश दत्तात्रय काटकर (वय २३, रा. शेळके मळा) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार १ जुलैला घडला होता. याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी दिली होती.

Web Title: Significant Crime