पुणे-बंगलोर महामार्गावर साईडपट्ट्या गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:42+5:302020-12-05T04:58:42+5:30
: रस्ते विकास महामंडळाने लक्ष देण्याची गरज विजय कदम कणेरी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ-शिरगाव जवळील ...

पुणे-बंगलोर महामार्गावर साईडपट्ट्या गायब
: रस्ते विकास महामंडळाने लक्ष देण्याची गरज
विजय कदम
कणेरी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ-शिरगाव जवळील मुख्य हायवेच्या रस्त्याच्या बाजूपट्ट्या (साईडपट्ट्या) खचल्याने दुचाकीचे अपघात वाढले आहेत. या साईडपट्ट्यांचे मजबुतीकरण न झाल्याने दुचाकी घसरून वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजमार्ग प्राधिकरण व रस्ते विकास महामंडळाने महामार्गावरील रस्त्याच्या साईडपट्ट्या भरून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. महामार्गावर साईडपट्ट्या करतानाच त्याचे दर्जेदार काम न झाल्याने साईडपट्ट्या पूर्ण खचल्या आहेत. गोकुळ-शिरगावपासून कागल चेक पोस्टपर्यंत हीच अवस्था आहे. दुचाकीस्वाराला दुचाकी मुख्य रस्त्यावर घेताना ती घसरण्याची भीती आहे. त्यामुळे साईडपट्टीवरील दुचाकीप्रवास धोक्याचा बनला आहे.
_________________ चौकट :- सर्व्हिस रोडचं नाही : पुणे-बंगलोर महामार्गावर उजळाईवाडीजवळ मयूर पेट्रोल पंप ब्रिजपर्यंत सर्व्हिस रस्ता नाही. त्यामुळे उलट दिशेने वाहनधारक वेगाने प्रवास करतात. रस्ते विकास महामंडळाच्या रस्ते देखभाल दुरुस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना याविषयी वारंवार सांगूनही सर्व्हिस रस्ता देण्यास टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे उलट दिशेने येणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलीसही कारवाई करीत नाही.
कोट -
महामार्गाच्या साईडपट्ट्या खचल्याने होणाऱ्या अपघातास प्राधिकरण व रस्ते विकास महामंडळ यांना जबाबदार धरण्यात यावे. अपघातातील जीवित व वित्तहानी शासन, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावे.
बाजीराव पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, गोकुळ शिरगाव
फोटो ओळ : ०४ गोकुळ शिरगाव साईडपट्ट्या
पुणे-बंगलोर महामार्गावर गोकुळ शिरगाव जवळ रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या खचलेल्या आहेत. फोटो विजय कदम, कणेरी