शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील बेपत्ता सिद्धार्थ वाझे परतला, नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला

By उद्धव गोडसे | Updated: November 27, 2023 19:17 IST

ऑफिसला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता

कोल्हापूर : टाकाळा परिसरातील एस. व्ही. एन्टरप्रायझेसचा मालक सिद्धार्थ राजू वाझे (वय २६, रा. शाहू मिल कॉलनी, राजारामपुरी, कोल्हापूर) हा १६ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. अखेर सोमवारी (दि. २७) सकाळी तो सुखरूप परतला. आर्थिक अडचणीतून आलेल्या नैराश्यामुळे निघून गेल्याची कबुली त्याने राजारामपुरी पोलिसांकडे दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, टाकाळा परिसरातील एस. व्ही. एन्टरप्रायझेस शेअर ट्रेडिंग कंपनीचा प्रमुख सिद्धार्थ वाझे हा ऑफिसला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. १६ नोव्हेंबरच्या रात्री तो परत न आल्याने वडिलांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. त्याने दोन्ही मोबाइल ऑफिसमध्येच ठेवल्यामुळे आणि नातेवाईकांसह मित्रांना संपर्क साधत नसल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. अखेर सिद्धार्थ सोमवारी सकाळी घरी परतला. आर्थिक अडचणीतून आलेल्या नैराश्यामुळे निघून गेल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. कोल्हापुरातून रेल्वेने बाहेर पडल्यानंतर तो वाराणसी, काशी, पुणे, तुळजापूर, अक्कलकोट येथे राहिला. मुलगा परत आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंPoliceपोलिस