शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

आजरा तहसीलवर ‘श्रमुद’चा मोर्चा

By admin | Updated: January 23, 2015 00:47 IST

लाभार्थ्यांची चौकशी थांबवा : पेन्शन तीन हजार करा

आजरा : श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आजरा तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, निराधार महिला, अपंग व वृद्धांचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात बाजार मैदान येथून करण्यात आली. मोर्चा आजरा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, केंद्र व राज्यातील सरकार आता बदलले आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नसणारी मंडळी सत्तेत आली आहेत. अशा मंडळींशी येथून पुढे लढा उभारावा लागणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न संघटितरीत्या मार्गी लावण्याची गरज आहे.एकीकडे लाखो कोटी रुपयांचे घोटाळे करणारे मंत्री समाजात खुलेआम वावरत असताना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राजीव गांधी वृद्धापकाळ योजनांच्या लाभार्थ्यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावण्यात आला आहे. मुळातच या मंडळींना ६०० रुपये इतकी अत्यल्प पेन्शन दिली जात असताना ती वाढवून तीन हजार करण्यात यावी, अशी मागणी ‘श्रमुद’ची आहे. शेजारील कर्नाटक व गोवा राज्यांमध्ये ही पेन्शन जादा आहे.अपंग व्यक्तीच्या प्रमाणपत्राचा प्रश्नही गंभीर आहे, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी सुभाष दोरुगडे, संग्राम सावंत, निवृत्ती कांबळे, डॉ. नवनाथ शिंदे यांची भाषणे झाली. मोर्चाच्यावतीने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी दशरथ घुरे, नारायण भडांगे, मंगल कांबळे, कृष्णा सावंत, बाळू सावंत, तुकाराम सुतार, नागेश गुरव यांच्यासह ‘श्रमुद’चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोर्चाच्या मागण्यासंजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना लाभार्थ्यांची चौकशी थांबवावी.सर्व पेन्शन योजना तीन हजार प्रति महिना करावी.अपंग व्यक्ती प्रमाणपत्र देण्याची गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था व्हावी.रेणुका जाधव या महिलेच्या पेन्शनची चौकशी थांबवावी.