संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:46+5:302021-05-04T04:10:46+5:30

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. डी. ...

Short story | संक्षिप्त वृत्त

संक्षिप्त वृत्त

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीमध्ये सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. डी. धनवडे यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर, बॉटल्स व सॅनिटझर स्टँडचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी गुरव, उपसरपंच विश्वास धनवडे, ग्रामसेवक विजय कोळी, पोलीस पाटील संदीप साजणे यांनी साहित्य स्वीकारले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पूनम धनवडे, सुप्रिया सावंत, शैलेंद्र गुरव, प्रवीण धनवडे, सतीश सावंत, जी. डी. धनवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

---------------------------------

नांदणी-शिरढोण रस्त्याचे काम सुरू

शिरोळ : नांदणी ते शिरढोण रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत होती. या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे वाहतुक सुरळीत होणार आहे.

---------------------

रस्त्यांची दुरुस्ती करा

जयसिंगपूर : शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. नांदणी नाक्याकडे जाताना रस्त्यातील खड्डे चुकवून वाहनधारकांना प्रवास करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Short story