थोडक्यात महत्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:04 IST2021-01-13T05:04:12+5:302021-01-13T05:04:12+5:30

नेसरी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या नेसरी शाखाध्यक्षपदी प्राचार्य आर.बी. पाटील यांची फेरनियुक्ती केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ...

In short important | थोडक्यात महत्वाचे

थोडक्यात महत्वाचे

नेसरी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या नेसरी शाखाध्यक्षपदी प्राचार्य आर.बी. पाटील यांची फेरनियुक्ती केल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष एम.एल. चौगुले यांनी दिली.

नेसरी शाखा सल्लागार मंडळात प्रा. दादासाहेब पाटील, प्रा. विठ्ठल दळवी व प्राचार्या शमा कुरणे यांचा समावेश आहे.

प्राचार्य पाटील हे नेसरी शाखेच्या स्थापनेपासूनच शाखाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. संस्थेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान विचारात घेऊन त्यांची शाखाध्यक्षपदी फेरनियुक्ती केल्याचे चौगुले यांनी सांगितले.

* आर.बी. पाटील : १२०१२०२१-गड-०९

---------------------------------------------

२) गडहिंग्लज येथे शनिवारी शोकसभा

गडहिंग्लज : लायन्स क्लबचे प्रांतपाल व येथील गजानन नागरी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रा. रवींद्र देशपांडे यांच्या निधनानिमित्त शनिवारी (दि. १६) दुपारी ४ वाजता गजानन पतसंस्थेच्या सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती सचिव श्रीनिवास जोशी यांनी दिली.

Web Title: In short important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.