कोल्हापुरात १५ जूनपर्यंत ७ ते ११ पर्यंतच दुकाने सुरु लॉकडाऊनला मुदतवाढ : कोरोना रुग्णस्थिती अजूनही गंभीरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST2021-06-01T04:18:42+5:302021-06-01T04:18:42+5:30

कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या सुरु आहेत तशीच सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहतील व त्यानंतर दिवसभर लॉकडाऊन ...

Shops in Kolhapur open from 7 to 11 till June 15 | कोल्हापुरात १५ जूनपर्यंत ७ ते ११ पर्यंतच दुकाने सुरु लॉकडाऊनला मुदतवाढ : कोरोना रुग्णस्थिती अजूनही गंभीरच

कोल्हापुरात १५ जूनपर्यंत ७ ते ११ पर्यंतच दुकाने सुरु लॉकडाऊनला मुदतवाढ : कोरोना रुग्णस्थिती अजूनही गंभीरच

कोल्हापूर : कोल्हापुरात सध्या सुरु आहेत तशीच सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहतील व त्यानंतर दिवसभर लॉकडाऊन अशीच स्थिती १५ जूनपर्यंत कायम राहणार आहे. सध्याच्या ब्रेक-द-चेन अंतर्गत लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांना जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी मुदतवाढ दिली. शेजारच्या सांगलीत आतापर्यंत कडक लॉकडाऊन होता, तिथे आता सकाळी ७ ते ११ यावेळेत दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

कोरानाची साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वीचे सर्व प्रतिबंधात्मक आदेश व स्पष्टीकरणांना दि. १ जूनपासून सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. दि. १४ एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून ते १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले होते. या आदेश व स्पष्टीकरणांना १५ मे रोजीच्या सकाळी ७ वाजल्यापासून ते १ जून २०२१ रोजीचे सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आता वाढविण्यात आली आहे.

ठरवून दिलेली वेळ पाळा...

दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास ही दुकाने कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

Web Title: Shops in Kolhapur open from 7 to 11 till June 15