शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

दुकाने तेवढी बंद, रस्त्यावर मात्र वर्दळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 5:44 PM

CoronaVirus Kolhapur : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पहिला दिवस या नियमाचे केवळ फार्सच ठरला. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती, तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत होते. रस्त्यावर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी असं म्हणण्याची वेळ आली.

ठळक मुद्देदुकाने तेवढी बंद, रस्त्यावर मात्र वर्दळचशहरातील चित्र : कुठे आहे संचारबंदी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लागू केलेल्या संचारबंदीचा पहिला दिवस या नियमाचे केवळ फार्सच ठरला. बाजारपेठेतील मोजकी दुकाने बंद होती, तर वाट्टेल ती कारणे सांगून नागरिक शहरात बिनधोकपणे फिरत होते. रस्त्यावर एवढी वर्दळ होती की, कुठे आहे संचारबंदी असं म्हणण्याची वेळ आली.राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी बुधवारी (दि. १४ एप्रिल) रात्री आठ ते १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी जाहीर करताना नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन करण्यात आले होेते; पण त्याउलट परिस्थिती गुरुवारी सकाळपासून कोल्हापूर शहरात होती. वाट्टेल ती कारणे देत नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनांमधून फिरत होते. सकाळपासूनच शहरातील उपनगरांपासून ते मध्यवर्ती परिसर, भाजी मंडई, बाजारपेठांमध्ये लोक खरेदीसाठी येत होते. सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत शहरातील संचारबंदीची स्थिती पाहण्यासाठी फेरफटका मारताना जणू शहराला संचारबंदीतून सूट दिली आहे की काय, अशी शंका आली.ठिकठिकाणी ट्रॅफिक पोलिसांकडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कारण विचारले जात होते. लायसन्सची मागणी केली जात होती. योग्य कारण व लायसन्स नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात होती. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, शाहूपुरी, राजारामपुरीचा बाह्य परिसर, उपनगरांमध्येही सगळीकड़े अशीच वर्दळ होती.प्रत्येकाकडे दवाखान्याची फाईलदुपारी बारा वाजता बिंदू चौकात पोलीस, ट्रॅफिक पोलीस व कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी येथून जाणाऱ्या नागरिकांना अडवून फिरण्याचे कारण विचारत होते. त्यातील ७० टक्के लोकांनी दवाखान्याचे कारण पुढे केले. पुरावा दाखवा म्हटले की प्रत्येकाच्या डिकीत दवाखान्याची फाईल, औषधांची जुनी चिठ्ठी आहेच. शिवाजी पेठेतल्या महिलेला बिंदू चौकातल्या बेकरीतून पदार्थ घ्यायचे आहेत. कुणाला ट्रेझरीत जायचं आहे, तर कुणाला बँकेत, एकाच्या घरातला किराणा माल संपला आहे, कुणाला भाजी घ्यायची आहे, दुसऱ्याला व्यवसायाच्या साहित्यांची वाहतूक करायची आहे, अशी एक अनेक कारणे देत लोक फिरत होते. या कारणांना संचारबंदीतून सुट दिल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही अशी अडचण पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांनी मांडली.महाद्वार कडकडीत बंदशहरात एकीकडे मोठी वर्दळ असताना मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या महाद्वार रोडवर मात्र शुकशुकाट होता. दुकाने शंभर टक्के बंद होती. काही भाजी विक्रेते तेवढे रस्त्याकडेला बसले होते. राजारामपुरीतही शांतता होती. त्या उलट स्थिती लक्ष्मीपुरीत होती. इथे व्यावसायिकांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होती.९ ते ११ ची वेळ द्यावीसंचारबंदी होणार हे माहीत असल्याने लोकांनी बुधवारपर्यंत किराणा मालासह अत्यावश्यक सेवेतील वस्तूंचा साठा करून ठेवला होता. तरी दुकाने दिवसभर सुरू आहेत, म्हणून खरेदीला बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रशासनाने या अत्यावश्यक सेवेतील खरेदीसाठी रोज सकाळी नऊ ते अकरा अशी वेळ ठरवून द्यावी व त्यानंतर पूर्ण व्यवहार बंद ठेवावेत, अन्यथा या संचारबंदीला काही अर्थ राहणार नाही, अशी प्रतिक्रिया यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी व सुजाण नागरिकांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर