Shocking figures for the second day in a row | सलग दुसऱ्या दिवशी धडकी भरविणारे आकडे

सलग दुसऱ्या दिवशी धडकी भरविणारे आकडे

कोल्हापूर शहरामध्ये १५६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, त्याहीपेक्षा जास्त रुग्ण नगरपालिकांच्या क्षेत्रात आढळले आहेत. या शहरांमध्ये गेल्या २४ तासांत २१० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे या शहरांमध्ये अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. हातकणंगले तालुक्यातही १४७ रुग्णांची नोंद ही चक्रावणारी आहे. शाहूवाडी सारख्या छाेट्या तालुक्यातील आलेली ५४ ही रुग्णसंख्या मुंबईहून आलेल्या नागरिकांमुळे वाढली आहे का याचा आता तपास करावा लागणार आहे.

गेल्या २४ तासांमध्ये १५४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १६३७ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ५००५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट

कोल्हापूर

कसबा बावडा येथील ५४ वर्षीय महिला, सदर बाजार येथील ५९ वर्षीय पुरुष, कळंबा येथील ५८ वर्षीय पुरुष, फुलेवाडी येथील ६० वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील ४१ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ७४ वर्षीय पुरुष, साने गुरुजी वसाहत येथील ६६ वर्षीय पुरुष, नर्मदा पार्क फुलेवाडी येथील ३५ वर्षीय महिला

इचलकरंजी

आंबेडकर नगर येथील ८० वर्षीय पुरुष, जी. के. नगर येथील ६८ वर्षीय महिला, आसरा नगर येथील ७० वर्षीय महिला

हातकणंगले

पुलाची शिरोली येथील ४९ वर्षीय पुरुष, गणेशनगर माळभाग येथील ४९ वर्षीय महिला

पन्हाळा

नावली येथील ८९ वर्षीय पुरुष

करवीर

कळंबा येथील ६५ वर्षीय पुरुष

आजरा

लाटगाव येथील ८५ वर्षीय महिला

इतर जिल्हे

निपाणी येथील ५९ वर्षीय महिला, घनसावली ठाणे येथील ३५ वर्षीय पुरुष, गव्हाणवाडी रत्नागिरी येथील ५८ वर्षीय पुरुष, संगमेश्वर तालुक्यातील कानिवरे येथील ५३ वर्षीय पुरुष, धोपेश्वर धनगरवाडा येथील ६५ वर्षीय पुरुष, वाळवा तालुक्यातील कुरळप येथील ७२ वर्षीय पुरुष

Web Title: Shocking figures for the second day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.