शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सतेज पाटील गटाला धक्का, राजाराम कारखान्याचे १८९९ सभासद वैधच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 11:25 IST

१८९९ सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता

कोल्हापूर : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे १८९९ सभासद वैधच असल्याचा निकाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी सोमवारी दिला. हा कारखाना महाडिक यांच्याकडून काढून घ्यायचा यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गटाला हा धक्का मानला जातो.मतदार यादीवर दोन्ही बाजूने हरकती घेण्यात आल्या होत्या. या हरकतींवर प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्यासमोर एक मार्चला सुनावणी झाली. त्यावेळी दोन्ही बाजूनी आपले मत मांडले होते. यामध्ये १८९९ सभासदांवर विरोधी सतेज पाटील गटाने आक्षेप नोंदवलेला होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता प्रादेशिक सहसंचालकांनीही पुन्हा एकदा हा आक्षेप फेटाळून लावले व हे सभासद निवडणुकीत मतदानास पात्र झाल्याने हा मोठा धक्का मानला जातो. विरोधी आघाडीकडून शौमिका महाडिक यांच्या संस्था गटातील ठरावाबाबत नोंदवलेला आक्षेपही प्रादेशिक सहसंचालकांनी फेटाळून लावला. राजाराम कारखाना निवडणुकीच्या वाढीव सभासदांचा प्रश्र्न चांगलाच गाजला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी सभासदांचे हक्क अबाधित ठेवले होते. त्यानंतर पुन्हा विरोधी आघाडीने याच सभासदांवर आक्षेप घेतल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

ज्या पद्धतीने सप्तगंगा साखर कारखान्याचे पाच हजार सभासद एका रात्रीत कमी केले आणि तिथला सहकार संपवून टाकला, त्याच पद्धतीने राजाराम कारखान्यातही सभासद कमी करून सत्ता घ्यायची आणि सहकार संपवायचा, असाच आमच्या विरोधकांचा कुटिल डाव होता, पण तो न्यायालय व सहकार खात्याने उधळून लावला. आमच्या लढ्याला आज पुन्हा एकदा यश आले. निःपक्षपाती निर्णयासाठी कारखान्याच्या सर्व सभासदांच्यावतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांचे आभार मानतो. - अमल महाडिक, छत्रपती राजाराम कारखाना सत्तारूढ आघाडीचे नेते.

सभासद संख्येबद्दल दावे-प्रतिदावेमहाडिक गटाने १८९९ सभासद पात्र झाल्याचे म्हटले असले, तरी त्यास सतेज पाटील गटाने हरकत घेतली आहे. महाडिक गटाने मुद्दाम हा आकडा फुगवून व्हायरल केला असल्याचे पाटील गटाचे म्हणणे आहे. त्यांच्या मते आम्ही कारखान्याच्या ९९८ सभासदांविरोधात हरकत घेतली होती. तेवढ्याच सभासदांना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी वैध ठरवले आहे. असे असताना हे १८९९ सभासद आले कोठून? अशी विचारणा केली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलAmal Mahadikअमल महाडिक