शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- शिये बालिका अत्याचार प्रकरण: फॉरेन्सिककडून अहवालानंतर दोषारोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:08 IST

तपासासाठी बिहारला पथक पाठविणार, दोघांचाही गुन्ह्यात सहभाग

कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथील परप्रांतीय दाम्पत्यांच्या मुलीवर निर्घृण अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या माहितीसाठी पोलिसांचे एक पथक बिहारला जाणार आहे. गुन्ह्यात दोन्ही संशयितांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.फॉरेन्सिक अहवालानंतर या गुन्ह्यात नेमका कोणी लैंगिक अत्याचार केला आहे, हे उघड होणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. संशयित दोघांनी केलेल्या अत्याचाराचे ठोस पुरावे पोलिसांना मिळाले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. वैद्यकीय अहवाल, फॉरेन्सिक अहवालानंतरच या गुन्ह्याचा सविस्तर तपास होणार आहे.दोघेही संशयित बिहार राज्यातील असून दुसरा संशयित शेजारील जिल्ह्यातील आहे. फॉरेन्सिक अहवालानंतर दोघा संशयितांवर भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत. त्याबाबत पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, तपास अधिकारी, विशेष तपास पथकाने संशयितांकडे कसून चौकशी केली आहे. त्यामध्ये दोघांनीही गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल मिळाल्यानंतरच संशयितांवर दोषारोप दाखल केला जाणार आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाने एकाच वेशातील सहा जणांकडे कसून चौकशी केली. त्यात घडलेल्या घटनेच्या ठिकाणाहून एक संशयित विरुद्ध बाजूने शेताकडून बाहेर पडला आहे. त्या दोघांच्या विरोधातही दोषारोप दाखल होणार असल्याचेही वरिष्ठांनी सांगितले.दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेला दुसरा संशयित हा १९ वर्षांचा असून बिहारी मजूरच आहे. शिये परिसरातच तो राहतो. पीडित मुलीवर अत्याचार करण्यापूर्वी तिचा गळा दाबून एक डोळाही बाहेर काढल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली असून गुन्ह्यात वापरलेल्या हत्याराचा शोध सुरू केला आहे.

अश्लील व्हिडीओ सापडलेपोलिसांनी केलेल्या तपासात पहिल्या संशयिताला ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ सापडले आहेत. त्याला अशी विकृती असल्याचे तपासात उघड होत आहे. या विकृतीतून त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट होत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुसरा सापडलाताब्यात घेतलेला दुसरा संशयित हा बिहारी आहे. तपासात पोलिसांनी या परिसरातील अनेक सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यामध्ये सहा जणांवर पोलिसांचा संशय बळावला. त्यातील दिव्यांग असलेल्या एकाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यामध्ये त्याने या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याचीही वैद्यकीय तपासणी केली आहे.

वयाच्या पुराव्याचा शोधतपासात पीडित मुलीच्या घरात काहींची आधार कार्ड नाहीत. त्यामुळे त्यांचे नेमके वय किती होते, याचा शोध घेतला जाणार आहे. वयाची नोंद शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक बिहारकडे रवाना होणार आहे. पीडित मुलीचा जन्म ज्या दवाखान्यात झाला. तेथून जन्मतारखेची नोंद घेतली जाईल.

दुसऱ्या दिवशी जाऊन मृतदेह पाहिलापोलिसांनी ताब्यात घेतलेला दुसऱ्या संशयिताने त्या पीडितेवर अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटनेच्या ठिकाणी जाऊन तिचा मृतदेह पाहिला. परिसरात तो दहा ते पंधरा मिनिटे घुटमळला, असल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस